Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

Coffee With Ghee Is Really Helpful For Weight Loss: सध्या कॉफीमध्ये तूप टाकून प्यायचा किंवा बुलेट कॉफी पिण्याचा ट्रेण्ड खूपच वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही त्या पर्यायाचा विचार करत असाल तर एकदा हे वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 04:37 PM2024-09-30T16:37:43+5:302024-09-30T16:38:37+5:30

Coffee With Ghee Is Really Helpful For Weight Loss: सध्या कॉफीमध्ये तूप टाकून प्यायचा किंवा बुलेट कॉफी पिण्याचा ट्रेण्ड खूपच वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही त्या पर्यायाचा विचार करत असाल तर एकदा हे वाचा...

coffee with ghee is really helpful for weight loss, nutrition expert's opinion about weight loss with ghee coffee or bullet coffee | कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

Highlightsतुम्हाला काय वाटतं यामुळे वजन कमी होऊ शकेल का? ल्यूक कोटिन्हो जे सांगते आहेत, ते तुम्हाला पटतंय का? 

सध्या वाढतं वजन हा अनेक जणांपुढचा चिंतेचा विषय झाला आहे. कारण बहुतांश लोकांचं कामाचं स्वरुप बदललं असून त्यांना दिवसाचे ८ ते १० तास एका जागीच बसून काम करावं लागतं. शिवाय १० ते १२ तास कामासाठी घराबाहेर राहावं लागत असल्याने व्यायाम कधी करावा, हा प्रश्न असतोच. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलत चालल्या आहेत. जंकफूड, प्रोसेस्ड फूड खाण्यावर अनेकांचा भर आहे. असं सगळं असताना मग वजन भराभर वाढत जातं. ते तेवढंच झपाट्याने कमी व्हावं, ही अनेकांची इच्छा असते (coffee with ghee is really helpful for weight loss?). त्यातूनच मग वेटलॉसचे नवनवे ट्रेण्ड मार्केटमध्ये येत जातात. सध्या कॉफीमध्ये तूप टाकून पिण्याचा ट्रेण्ड खूप गाजतो आहे. त्यालाच काही ठिकाणी बुलेट कॉफी असंही म्हणतात. (nutrition expert's opinion about weight loss with ghee coffee or bullet coffee)

 

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने वजन कमी होतं का?

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने किंवा बुलेट कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का याविषयीची माहिती डाएट आणि न्युट्रिशन एक्सपर्ट ल्यूक काेटिन्हो यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

त्यांच्यामते कॉफी आणि तूप हे दोन्हीही पदार्थ वेगवेगळे गुणधर्म असलेले आहेत. त्यामुळे ते एकत्र करून पिण्यापेक्षा वेगवेगळे खाण्याचेच अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी तूप टाकून कॉफी पिणे हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ वेगवेगळेच राहू द्या आणि वेगवेगळेच खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

ल्यूक कोटिन्हो यांच्या या पोस्टवर वेटलॉस करण्यासाठी बुलेट कॉफी घेणाऱ्यांच्या भरमसाठ कमेंट आल्या आहेत. त्या सगळ्यांनाच ल्यूक यांनी वजन कमी करण्याचा एक खास सल्ला दिला आहे. तो म्हणजे "eat smart, move more, sleep and breathe deep and stay consistent...keep it simple."

सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

त्यांचं हे वाक्य खरोखरच वजन घटविण्याचा नियम असल्याप्रमाणे आहे. तुम्ही जर जंक, प्रोसेस्ड फूड टाळून घरचं सकस अन्न खाल्लं, दररोज व्यायाम केला, पुरेशी झोप घेतली आणि या रुटीनमध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते... तुम्हाला काय वाटतं यामुळे वजन कमी होऊ शकेल का? ल्यूक कोटिन्हो जे सांगते आहेत, ते तुम्हाला पटतंय का? 


 

Web Title: coffee with ghee is really helpful for weight loss, nutrition expert's opinion about weight loss with ghee coffee or bullet coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.