स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता. याच्या सेवनाने शरीराली चरबी कमी होण्यास मदत होते. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. त्यापेक्षा जर घरगुती उपायांचा वापर केला तर कमीत कमी वेळात जास्त वजन कमी होण्यास मदत होईल. (Coriander Water For Wright Loss Fat Burning Drink)
स्वयंपाकघरात आढळणाऱ्या धण्यांमध्ये पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक एसिड, व्हिटामीन ए आणि असते. या मसाल्याचे योग्य पद्धतीने सेवन केले तर तुम्ही अगदी सहज वजन कमी करू शकता. (Easy Ways To Eat Coriender Seeds For Weight Loss)
एका अभ्यासात असे दिसून आले की दिवसाला २ ग्रॅम धणे पावडर खाल्ल्याने शरीरातील लिपिड पॅरामिटरर्स तीव्र परिणाम करतात. (Ref) ज्यामुळे तुमच्या शरीरात चरबी जमा होणार नाही. चरबी जळण्यासही मदत होते. अतिरिक्त वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. धण्याच्या सेवनाने पचनाच्या समस्याही दूर होतात. (How to Use Coriander Water For Weight Loss Fat Burning Drink)
वजन कमी करण्यासाठी धणे कसे फायदेशीर ठरतात?
धण्यांच्या बियांमध्ये फायबर्स असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. धण्याच्या दाण्यांमध्ये फॅट बर्निंग गुण असतात. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. धण्याचे पाणी बनवण्यासाठी २ चमचे धण्याच्या दाण्यांमध्ये दीड ग्लास पाणी घाला.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
हे पाणी उकळल्यानंतर गाळून घ्या. (Weight Loss Tips) पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकताा. याशिवाय रात्रीच्यावेळी जेवल्यानंतर एक तास आधी धण्यांच्या दाण्यांचे पाणी पिऊ शकता. ज्यामुळे वेगाने फॅट बर्न होईल आणि एक्सेस फॅट कमी होण्यासही मदत होईल.
धण्यांचे पाणी पिण्याचे फायदे
धण्यांचे पाणी प्याययल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. हे पाणी प्यायल्याने पोट फुगणं, गॅस होणं अशा आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. ब्लोटींगमुळे पोट दुखीच्या वेदनाही जाणवत नाहीत. धण्यांचे पाणी हा वजन कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे.
आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट
एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे धण्यांचे पाणी एक उत्तम डिटॉक्स वॉटर आहे. या पाण्यामुळे शरीराला नुकसान पोहोचवणारे फ्रि रॅडिकल्स कमी होतात आणि टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
खराब पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी धण्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता. धण्याचे पाणी प्यायल्याने डायबिटीसच्या रुग्णांना जास्तीत जास्त फायदे मिळतात. या बियांच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.