Join us  

कोरोनाकाळात कफ वाढणं फार घातक, आणि तरी तुम्ही कफ वाढवणारे पदार्थच खाताय ? -सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 3:28 PM

कोरोना मध्ये टार्गेट ऑर्गन फुफ्फुसं हा आहे आणि लक्षणं निर्माण होताना सर्दी,खोकला, ताप अशा स्वरूपाची होतात हे आता माहीत झालं आहे त्यामुळे शरीरातील कफ दोष वाढेल असा आहारटाळणं खूप गरजेचं आहे.

ठळक मुद्देकाय खायचं काय टाळायचं हे फिक्स आहे, पण कोरोनाच्या बाबतीत मात्र सगळंच नवीन

वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)

एरवी कधीही घरात कोणी आजारी पडलं व त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेलं तर औषधं वगैरे दिल्यानंतरमहत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे खाण्याविषयी !ताप आलाय,काय खायचं? कावीळ झालीय काय द्यायचं खायला? कारण स्वस्थ असो वा आजारी असो ,शरीराला पोषण तर लागतंच आणि ते मिळतं योग्य आहारातून!शिवाय त्यामागे पथ्यापथ्य असा विचार असतोच कारण सगळ्या आजारांमध्ये काही गोष्टी पथ्यकर असतातम्हणजे अमुक पदार्थ खाल्ल्याने आजार लवकर बरा व्हायला मदत होते तर काही पदार्थ खाल्ल्याने आजार वाढूशकतो ,त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घेणं हे औषधोपचार करण्या इतकंच महत्वाचं आहे.सर्दी, खोकला, ताप, फ्लू ,डायबेटीस हे आजार आपल्याला आधीपासूनच परिचित होते त्यामुळे त्यांचं पथ्यापथ्यसुरुवातीपासून सेट आहे ,काय खायचं काय टाळायचं हे फिक्स आहे पण कोरोनाच्या बाबतीत मात्र सगळंच नवीन होतं ,लक्षणं पण वारंवार बदलत गेली त्यामुळे गोंधळ जास्त होता ,अशावेळी त्याबद्दल शास्त्रीय माहिती जाणून मग काय खायचं काय नाही हे फॉलो केलं तर अधिक चांगलं लागू पडतं.कोरोनाच्या संबंधित तीन गट सर्वसामान्य पणे आढळतात.

पहिला ग्रुप म्हणजे ज्यांना कोरोना झालेला नाही आणि तो होऊ नये म्हणून जे जे करणं शक्य आहे ती सगळी काळजी घेणारे लोक.दुसरा ग्रुप म्हणजे कोरोनाची लागण झाल्यापासून ,टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून ते पुढचे चौदा दिवस असणारा काळ यात असणारे रुग्ण ( हे गृहविलगीकरणात असू शकतात किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असू शकतात, ते त्यांच्या गांभीर्यावर अवलंबूनअसते)आणि तिसरा गट म्हणजे ज्यांनी कोविड वर मात केली आहे, ज्यांचा चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे, टेस्ट निगेटिव्ह आली आहे, ऍडमिट असतील तर डिस्चार्ज घेऊन जे रुग्ण घरी परत आले आहेत असे पोस्ट कोविडरुग्ण !हे सगळे कोविडशी संबंधित असले तरी त्या तिन्ही गटांची आहारविषयक गरज वेगवेगळी असते कारण तिन्हीकंडिशन्स मध्ये शरीरात घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण क्रमशः त्या विषयी जाणून घेऊ.आजारी पडावं असं कधीच कोणाला वाटत नसतं पण मग स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी तशी काळजी पण घ्यावी लागते. एरवी देखील सिझन चेंजमुळे वेगवेगळ्या तक्रारी उद्भवू शकतात तेव्हा त्या त्या वेळी तशी काळजी घेणं अपेक्षितच असतं. कोरोना हा तर महामारी स्वरूपाचा आजार आहे तेव्हा तो होऊ नये किंवा आपणत्यापासून कसं सुरक्षित राहू शकतो याचा विचार करायचा झाला तर दोन तीन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.पहिलं म्हणजे आपली प्रतिकारशक्ती उत्तम कशी राहील यासाठी प्रयत्न करणं आणि दुसरं म्हणजे चुकीचा आहार विहार आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेणं !यासाठी खालील टिप्स महत्वाच्या आहेत.

कोरोना मध्ये टार्गेट ऑर्गन फुफ्फुसं हा आहे आणि लक्षणं निर्माण होताना सर्दी,खोकला, ताप अशा स्वरूपाची होतात हे आता माहीत झालं आहे त्यामुळे शरीरातील कफ दोष वाढेल असा आहारटाळणं खूप गरजेचं आहे. मागच्याही वर्षी कोरोना सुरु झाला त्यावेळी सुरुवातीचे तीन चार महिने आणि याहीवेळी दुसरी लाट आली तेव्हापासून उन्हाळा चालू असल्यामुळे सगळ्यांचं थंड गोष्टींकडे आकर्षण जास्त असतं. पण ते घातक आहे त्यामुळे,१. थंड पाणी, कोल्डड्रिंक्स, आईस्क्रीम यांचा वापर सांभाळून करावा, विशेषतः रात्री यांचे सेवन टाळावेच.२. आंबट पदार्थ खाल्ल्याने कफ होणे,घसा धरणे,दुखणे, खोकला येणे यासारख्या तक्रारी उद्भवतात त्यामुळेदही,ताक,लिंबू ,कैरी यांचा नियंत्रित वापर करावा. चाटचे वेगवेगळे पदार्थ बनवताना चिंचेचं पाणी सढळहाताने वापरलं जातं ,त्याची काळजी घ्यायला हवी.३. फळांमध्ये पेरु, केळी कफ वाढवतात ,विशेषतः लहान मुलांना देणं टाळावं. संत्री मोसंबी ही फळं खाताना गोड आहेत याची खात्री करावी नाहीतर घसा दुखू शकतो.४. लॉक डाऊन मुळे सगळे सदस्य घरातच असल्याने घरोघरी भरपूर प्रमाणात देशी विदेशी पदार्थ मागच्यावर्षभरात भरपूर केले गेले आणि तो ट्रेंड अजूनही चालूच आहे.यात खूप जास्त प्रमाणातबटर,चीज,पनीर,मैदा,साखर ,दही या पदार्थांचा वापर केला जात असल्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणातकफ वाढतो व तो श्वासनसंस्थेच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतो म्हणून हे पदार्थ कितीही चविष्ट लागतअसले आणि मुलं त्याची वारंवार डिमांड करत असली तरी ते कमीच खाल्लेले बरे !५. सरबत, पन्हं यांचा वापर दुपारी उन्हाच्या वेळी थोडा करण्यास हरकत नाही पण खूप चिल्ड पाण्यात सरबतइ.बनवू नये. माठातील पाणी चालेल.६. आहाराच्या बाबतीत ही दक्षता घेतल्यास व कोरोनाचा इतर प्रोटोकॉल पाळत राहिल्यास आपण या आजारापासून दूर राहू शकतो ,तसे प्रयत्न करणं आपल्याच हातात आहे ,नाही का ?

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)rajashree.abhay@gmail.comwww.ayushree.com

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या