वैद्य राजश्री कुलकर्णी, (M.D. आयुर्वेद)
कोरोनाची काही लक्षणं दिसली की पहिली पायरी म्हणजे RTPCR ही चाचणी करुन घेणं ! यावरुन पेशंट कोरोनापॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते समजतं . रॅपिड अँटिजेन ही अजून एक चाचणी आहे ज्याद्वारे हे निदान करतायेते. नाकातील आणि तोंडातील स्वाब घेणं आणि त्याची तपासणी करणं हे अधिक खात्रीशीर माहितीमिळण्यासाठी गरजेचं आहे. मागच्या वर्षभरात हे सगळे शब्द सर्वसामान्य लोकांना माहीत झाले नव्हे मेंदूत जणू कोरले गेले! फुफ्फुसं या अति महत्वाच्या अवयवावर कोरोना अटॅक करत असल्याने त्याच्याशी संबंधित लक्षणांकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच घरांमधून त्यामुळे हल्ली पल्स ऑक्सिमिटर हे छोटंसं पण तितकंच महत्वाचं मशीन दिसतं जे खरंच उपयुक्त आहे. या मशीनमध्ये आपल्या नाडीची गती म्हणजेच पल्स मोजली जाते. ताप आला असेल तर ही गती वाढलेली असते त्यामुळे वॉच ठेवणं सोपं जातं. जर ही गती शंभर पेक्षा जास्त वाढलेली आढळली तर तत्काळ मेडिकलॲडव्हाइस घेणं गरजेचं आहे. मात्र काहीजण काय करतात शंका आली की डॉक्टरचा सल्ला न घेता सरळ स्कॅन करायला धावतात. स्कॅन मनानंच करणं, तिथे गर्दी करणं हे कोरोना संसर्ग वाढीस पूरक असू शकतं हे ही लक्षात येत नाही. त्यामुळे मनानेच असं काही करणं धोक्याचं आहे.
फुफ्फुसावर कोरोनाचा अटॅक झाल्यावर कधी कधी अगदी जलद गतीने त्यावर परिणाम होतो व त्याच्यापेशी मृत होतात व ऑक्सिजनची देवाणघेवाण करणाऱ्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. यातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल किंवा कॉन्सनट्रेशन कितीआहे ते ! शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि एरवी ही गरज फुफ्फुसे लीलया पूर्ण करत असतात. पण जर ही ऑक्सिजन घेणं,रक्त शुद्ध करून ते सर्व शरीराकडे हृदयाद्वारे पोचवणे हे काम फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने करु शकली नाहीत तर मात्र शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते व त्या संबंधित लक्षणं निर्माण होऊ लागतात.श्वास घ्यायला त्रास होणं, धाप,दम लागणं, जागेवर बसल्या बसल्या देखील दम लागणं, जीव घाबरणं, छातीगच्च झाल्याप्रमाणे वाटणं, श्वास कोंडणं, बोलतानाही धाप लागणं ही लक्षणं सिरीयस आहेत आणि अशा वेळीतातडीनं मेडिकल हेल्प गरजेची आहे. सुरुवातीला शरीर माईल्ड स्वरुपात सिग्नल देत असतं ,त्रास एकदम वाढतनाही परंतु खूप रुग्ण त्रास होत असताना देखील दुर्लक्ष करतात ,कधी घाबरुन तर कधी ओव्हर कॉन्फिडन्स मुळे!या दोन्ही प्रकारच्या पेशंट्स मध्ये दोन तीन दिवसांतच परिस्थिती गंभीर होऊन एकदम व्हेंटिलेटरवर टाकावंलागणं किंवा प्रसंगी जीव गमवावा लागणं अशा घटना आम्हाला प्रॅक्टिस मध्ये मागच्या तीन महिन्यात जास्तप्रमाणात बघायला मिळाल्या आहेत ,त्यामुळे थोडीफार लक्षणं दिसत असतील तरी त्याकडे वेळेवर लक्ष पुरवणंआपलं स्वास्थ जपण्यासाठी गरजेचं आहे.ताप येणं, अचानक खूप डोकं दुखणं,वास येईनासा होणं, जिभेची चव जाणं, जुलाब होणं वगैरे काही लक्षणं दिसली तर कोरोनाची शंका घेऊन चाचणी करून घ्यायला हवी.
यात प्रामुख्याने दोन टेस्ट्स केल्या जातात .या सर्वसामान्य लोकांनी यापूर्वी कधी ऐकल्याही नव्हत्या.पहिलीटेस्ट म्हणजे RTPCR ! या मध्ये नक्की काय बघतात वगैरे डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही पण ती करणं काआवश्यक आहे ते मात्र समजून घ्यायला हवं. यामध्ये कोरोनाची शंका असणाऱ्या व्यक्तीच्या नाकातून किंवाघशातून स्वाब घेतला जातो.हे स्वाब सॅम्पल कोरोना व्हायरस आहे की नाही यासाठी अनालाईझ केलं जातं.सध्या उपलब्ध असणाऱ्या सगळ्या टेस्ट्स मध्ये ही सर्वात ऍक्युरेट व इफेक्टिव्ह चाचणी आहे. फॉल्स निगेटिव्हम्हणजे पॉझिटिव्ह असतानाही चुकून निगेटिव्ह येण्याची शक्यता यात अत्यल्प आहे .फक्त विषाणूंच्याइन्कयुबेशन काळात म्हणजे शरीरात शिरकाव झाल्यानंतर लक्षणं निर्माण होईपर्यंतच्या काळात जर ही टेस्टकेली गेली तर क्वचितच चुकीचे निष्कर्ष येऊ शकतात. त्यामुळे कोरोना आहे किंवा नाही याची खात्री करूनघ्यायची असेल तर RTPCR करणं अनिवार्य आहे.टेस्ट्सच्या बाबतीत दुसरं नाव सतत आपल्या कानावर पडतं ते म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट ! याला रॅपिडम्हणतात कारण याचा रिझल्ट अर्ध्या तासात येतो ,जो की RTPCR टेस्टमध्ये खूप उशिरा मिळतो .पण ही चाचणीतितकीशी ऍक्युरेट नाही. मूलतः ही टेस्ट लक्षणं नसल्यामुळे जे asymptomatic पेशंट्स बाहेर फिरतात, प्रवासकरतात ,काम नसताना उगीचच स्प्रेड करत फिरतात अशा लोकांसाठी आहे.टीव्हीवर पोलीस अशा लोकांनापकडून रॅपिड अँटीजेन टेस्ट करायला घेऊन जातात अशी दृश्यं आपण वारंवार बघतो. रेल्वे स्टेशन किंवाएअरपोर्ट वर देखील ही चाचणी केली जाते.यातही नाक किंवा घशातून स्वाब घेतला जातो. यात कधी कधीनिगेटिव्ह येणारी टेस्ट तीन चार दिवसांच्या अंतराने RTPCR केली तर पॉझिटिव्ह येऊ शकते.त्यामुळे खात्रीशीरटेस्ट म्हणजे RTPCR होय.ज्यांची RTPCR पॉझिटिव्ह येईल त्यांच्या मग इतर रक्ताच्या तपासण्या ,त्यातील मार्क किती व कसे आहेतयावरून ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवला जातो . मात्र डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट सुरु करण्यापूर्वी टेस्ट पॉझिटिव्ह आली की लगेच आयसोलेशन म्हणजे विलागीकरण, कुणाच्याही संपर्कात न येणं ,उलट आधी संपर्कात आलेल्यालोकांचा ट्रेस करून त्यांची टेस्ट करणं वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत.पुढचे पाच सहा दिवस रुग्णाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतात कारण त्या कालावधीत लक्षणं वाढूशकतात, फुफ्फुसांमध्ये विषाणूंचा संसर्ग पसरुन गंभीर लक्षणं निर्माण होऊ शकतात.त्यामुळे रुग्णाने स्वतःस्वतःवर बारीक लक्ष ठेवणं व काहीही बदल आढळल्यास लगेच डॉक्टरांना सूचित करणं आवश्यक असते.स्वत:च्या मनानेच स्वत:वर प्रयोग मात्र करत बसू नये.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)rajashree.abhay@gmail.comwww.ayushree.com