कोरोनाच्या प्रसारात लोकांना सगळ्यात कॉमन खोकल्याचा सामना करावा लागत आहे. गंभीर संक्रमणानं रोज हजारो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. व्हायरस रेस्पिरेटरी सिस्टिमवर हल्ला करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कफ तयार होत आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे. अशा स्थिती रोगप्रतिराकशक्ती चांगली बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिथिंग एक्सरसाईज करत आहेत. याशिवाय अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब केला जात आहे. वेलनेस कोच ल्यूक कॉटिन्हो (Luke Coutinho) ने हर्बल चहा पिण्याचे काही उपाय सुचवले आहेत. या हर्बल चहाने छातीतील कफ सहज बाहेर पडण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया हा हर्बल चहा कसा बनवला जातो.
चहा तयार करण्याचे साहित्य
१ इंच किसलेलं आलं
१ लहाशी दालचिनी
३ ते ४ तुळशीची पानं
१ लहान चमचा ओरिगॅनो
३ काळी मिरी
२ वाटलेली वेलची
१ लहान चमचा बडीशेप
१ चमचा ओवा
१ चमचा जीरं
कसा बनवायचा हर्बल चहा?
चहा बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक भांड घ्यावं लागेल. यात एक ते दीड ग्लास पाणी घालून वर नमुद केलेले सगळे पदार्थ घाला. भांड्यातील पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन सेवन करा. या चहाचा पुरेपूर परिणाम व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही व्यायामही करू शकता. जेणेकरून शरीर चांगलं राहिल. इंस्टाग्रामवर ल्यूक कॉटिन्हो यांनी पोस्ट करत हर्बल चहा बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
चहाच्या समानात लपलेले सीक्रेट
या चहासाठी लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात. या मसाल्यांनी फक्त जेवणाला चव येत नाही तर आयुर्वेदातही अनेक फायदे आहेत. आलं, दालचिनी, काळी मिरी, जीरं आणि ओव्यात एंटी ऑक्सिडेंटस आणि एंटी बॅक्टेरिअल तसंच एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. या मसाल्यांच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. कफ कमी होण्यास मदत होते. कोरोनाकाळात हर्बल चहाच्या सेवनानं फुफ्फुसांमधील कफ बाहेर निघण्यास मदत होईल.
चहा पिताना अशी घ्या काळजी
हर्बल चहा घरी उपलब्ध असलेल्या साध्या सामानापासून तयार होत असला तरी बर्याच प्रकरणांमध्ये ते त्रासदायक ठरतं. म्हणून गर्भवती महिला आणि स्तनपान करणा-या मातांनी असा चहा करण्यापूर्वी डॉक्टरांकडून सल्ला घ्यायला हवा. याव्यतिरिक्त आपण या हर्बल चहा पीत असाल तर पाण्याचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करा. जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.