बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यासोबतच भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया असा सगळा सुकामेवा आवर्जून खायला हवा, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. बरेच लाेक अगदी आठवणीने इतर सगळा सुकामेवा खातात. पण फक्त काजू खाण्याची त्यांना भीती वाटते. काजू खाऊन वजन वाढतं, असं त्यांच्या मनात अगदी पक्कं आहे. पण मॅग्नशियम, फॉस्फरस, फायबर यासोबतच इतरही अनेक पौष्टिक घटक देणारे काजू जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर त्यांचेही आरोग्याला खूप लाभ होतात. त्यामुळे काजूला असं एकदम बाजूला टाकून न देता काजू खाण्याची याेग्य पद्धत नेमकी कोणती (correct method of eating cashew) आणि त्यामुळे शरीराला काय लाभ होतात ते एकदा पाहूया..(benefits of eating cashew)
काजू खाण्याची योग्य पद्धत आणि काजू खाण्याचे फायदे
१. आहारतज्ज्ञ एकता सूद सांगतात की काजू हे नेहमी पाण्यात भिजवून किंवा भाजून खायला हवे. बदाम, अक्रोड हा सुकामेवा जसा रात्रभर पाण्यात भिजवून मग दुसऱ्यादिवशी खाल्ला जातो, त्याचप्रमाणे काजूही खावे. अशा पद्धतीने काजू खाल्ले तर त्यामुळे पचनशक्ती वाढते. तसेच काजूतील पौष्टिक घटकांचा शरीराला अधिक चांगल्याप्रकारे लाभ होतो.
World Saree Day: स्त्रियांचे सौंदर्य खुलविणाऱ्या ५ सुंदर साड्या, पाहा यापैकी तुमच्याकडे किती आहेत
२. काजूमध्ये हृदयाला उपयुक्त ठरणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. ते शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही भिजवलेले काजू खाल्ले तर हे फॅट्स शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषले जातात.
३. काजूमधून भरपूर प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे ज्यांचया शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते त्यांची नियमितपणे काजू खावे.
आपल्याकडे एवढं ऊन असूनही शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का असते? तज्ज्ञ सांगतात ३ कारणं
४. काजूमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के यासोबतच मॅग्नेशियम, कॉपर, झिंक चांगल्या प्रमाणात असतात.
५. काजूमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो किंवा रोजच पोट साफ व्हायला खूप वेळ लागतो, त्यांच्यासाठी काजू खाणे फायद्याचे ठरते.