बटाट्याची भाजी, बटाट्याचे पराठे, आलू वडा असे पदार्थ अनेकांच्या आवडीचे. पण नेमकं होतं काय की बटाटा खाऊन (eating potato will not increase weight) वजन वाढतं, हे आपल्याला माहिती असतं आणि त्याच भीतीने मग आपण बटाटा खाणं सोडून देतो किंवा खूपच कमी करून टाकतो. पण बटाटा खाताना काही नियम पाळले किंवा विशिष्ट पद्धतीनेच बटाटा खाल्ला तर मात्र वजन वाढण्याची भीती राहत नाही.. म्हणूनच बटाटा खाताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. केवळ वजनाच्या भीतीने बटाटा खाणं टाळू नका. कारण बटाट्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
बटाटा खाण्याचे फायदे (Benefits of potato)- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.- फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त- बटाट्यामध्ये पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. - व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ भरपूर प्रमाणात असते. - मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस हे घटक पुरेशा प्रमाणात असल्याने त्वचा तजेलदार राहण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो.- बटाट्यामध्ये फ्लेवनोईड ॲंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते.
वजन वाढू नये, म्हणून कसा खावा बटाटा (Healthy Way For Eating Potato)- बटाटा खाताना लक्षात ठेवण्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकावेळी एका दिवशी १७० ग्रॅमपेक्षा अधिक बटाटा खाऊ नये.- फ्राय करून बटाटे खाणे वजन वाढीच्यादृष्टीने अयोग्य आहे. त्यामुळे बटाटे एकतर उकडून खा, भाजून खा किंवा मग बेक करून खा.- उकडलेले बटाटे खाताना ते कधीच गरमागरम खाऊ नका. उकडून थंड झालेले आणि रुम टेम्परेचरला आलेले बटाटे खावेत. कारण थंड झालेल्या उकडलेल्या बटाट्यांमधील स्टार्च शरीरातील मेटाबॉलिझमसाठी फायद्याचे असते. - उकडून थंड झालेले बटाटे खाल्ल्यास पोट अधिककाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि आपोआपच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.- बटाट्याची साले देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी मानली जातात.