वाढत्या वजनाची चिंता सध्या अनेकांना छळते आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक नियमितपणे व्यायाम करतात तर काही जण आहारावर भर देतात. या दोन्ही गोष्टी पाळून सुरक्षित पद्धतीने हळूहळू वजन कमी करणं योग्य आहे. पण काही लोकांना मात्र बारीक, सडपातळ होण्याची घाई झालेली असते. त्यामुळे ते लोक मग झटपट वजन कमी करण्याच्या मागे लागतात. पण असं करणं आरोग्यावर बेतू शकतं अशी सक्त सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने दिली आहे. याशिवाय आठवड्याला किती वजन कमी करणं योग्य असतं आणि त्याची सुरक्षित पद्धत कोणती याचीही नियमावली जाहीर केली आहे.
ICMR नुसार वजन कसं कमी करावं?
१. पुरेश भाज्यांसह संतुलित जेवण
उच्च फायबर व पोषकतत्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात घ्या. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होणार नाही. अतिरिक्त कॅलरीजची गरज कमी करेल.
स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चुका करताय..
२. भाज्यांचे प्रमाण वाढवा
कमी कॅलरी आणि जीवनसत्वे जास्त तसेच खनिजे व फायबर हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात असणाऱ्या भाज्या आहारात असाव्या. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
३. स्नॅक्स कसा असावा?
बऱ्याचदा दोन जेवणांच्या मध्ये आपल्याकडून जे पदार्थ खाल्ले जातात ते तेलकट, तुपकट, मसालेदार असतात. या पदार्थांमुळे वजन वाढू शकते. त्यामुळे स्नॅक्स म्हणून काजू, दही, मसाला लावलेल्या भाज्या असं काही हेल्दी खा.
जेवताना फक्त ३ गोष्टींची काळजी घ्या- ब्लड प्रेशर वाढण्याचं टेन्शन विसरा, वाचा डॉक्टरांचा सल्ला
४. निरोगी स्वयंपाक पद्धती
तळलेले तेलकट, तुपकट पदार्थ आहारात कमी प्रमाणात असावेत. त्या तुलनेत पदार्थ वाफवून, उकडून, बेक करून खाणे अधिक चांगले.
५. साखरयुक्त पेये टाळा
साखर तसेच दुकानात विकत मिळणारे साखर घातलेली सरबते पिणे टाळा. त्याऐवजी पाणी, ताक, घरी केलेली सरबते असे पिण्यास प्राधान्य द्या...