Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो?

कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो?

Health tips: गायीचं दूध आणि म्हशीचं दूध पिण्याचे जसे वेगवेगळे फायदे आहेत, तसंच तुपाच्या (benefits of desi ghee) बाबतीतही आहे. तुमच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते बघा आणि त्या दृष्टीने कोणतं तूप खायचं ते ठरवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:42 PM2022-02-26T17:42:10+5:302022-02-26T17:43:04+5:30

Health tips: गायीचं दूध आणि म्हशीचं दूध पिण्याचे जसे वेगवेगळे फायदे आहेत, तसंच तुपाच्या (benefits of desi ghee) बाबतीतही आहे. तुमच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते बघा आणि त्या दृष्टीने कोणतं तूप खायचं ते ठरवा..

Cow ghee or buffalo ghee, which one is more beneficial for health? what is the main difference between these two ghee? | कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो?

कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो?

Highlightsगायीचं तूप की म्हशीचं तूप हा प्रश्नही अनेकांच्या मनात येतोच. म्हणूनच तर वाचा या दोन्ही तुपांमध्ये काय मुख्य फरक आहे ते..

गरम भात असो, पोळी असो किंवा एखादा पराठा आणि पुरणपोळी....  त्यावर जोपर्यंत तुपाची धार येत नाही,  तोपर्यंत त्या पदार्थाची चव काही खूलत नाही. साजूक तुपाची जोड मिळाल्यानंतर कोणत्याही पदार्थाची चव बदलून जाते. यासोबतच साजूक तूप खाण्याचे अनेक आरोग्यदायी लाभ (benefits of eating ghee) देखील आहेत. वजन वाढेल या भीतीने अनेक लोक तूप खाणं टाळत असले तरी तूप हे एनर्जीचं पॉवर हाऊस (Cow ghee or buffalo ghee?) आहे, असं अनेक फिटनेस तज्ज्ञ मानतात. 

 

शुद्ध तुपामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही तूप खाणे फायदेशीर ठरते. तुपामुळे जेवणाचं उत्तम पचन होतं, त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात तूप असायलाच पाहिजे. पण काेणतं तूप खावं, गायीचं की म्हशीचं, हा प्रश्नही अनेक जणांच्या मनात डोकावतो. गायीचं दूध चांगलं की म्हशीचं असा प्रश्न नेहमी विचारला जातो, तसाच गायीचं तूप की म्हशीचं तूप हा प्रश्नही अनेकांच्या मनात येतोच. म्हणूनच तर वाचा या दोन्ही तुपांमध्ये काय मुख्य फरक आहे ते..

 

गायीचे तूप खाण्याचे फायदे (health benefits of cow ghee)
- वजन कमी करण्याचा स्ट्राँगली प्रयत्न करत असाल, तर गायीच्या दुधपासून बनलेलं तूप खाण्यास प्राधान्य द्या. कारण या तुपामध्ये फॅटचे प्रमाण तुलनेनं कमी असतं.
- गायीचे तूप पचनास अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे व्यवस्थित अन्नपचन होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- गायीच्या दुधात प्रोटीन अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीन रिच तूप पाहिजे असल्यास गायीचं तूप खावं.
- गायीचं तूप हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. कारण या तुपामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 

म्हशीच्या दूधाचे तूप खाण्याचे फायदे (health benefits of buffalo ghee)
- म्हशीच्या तुपामध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे तूप दिर्घकाळ साठवून ठेवता येते.
- म्हशीचे दूध हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.
- जे लोक अशक्त आहेत, त्यांनी अशक्तपणा घालविण्यासाठी म्हशीच्या दुधपासून बनविलेले तूप खाण्यास प्राधान्य द्यावे. 
- म्हशीच्या तूपात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतात. 


 
कोणते तूप खाणे अधिक फायदेशीर (which ghee is more beneficial?)

- दोन्ही प्रकारचे तूप निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण तरीही गायीचे तूप खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. कारण गायीचे तूप पचनासाठी अधिक उत्तम मानले जाते. 
- तसेच गायीच्या तुपामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.  
 

Web Title: Cow ghee or buffalo ghee, which one is more beneficial for health? what is the main difference between these two ghee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.