अनेक आधुनिक प्रकारांनी पोटावरची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करुनही काही उपयोग होत नसल्यास आजीच्या बटव्यातला उपाय करुन पाहावा. हा उपाय आहे जिऱ्याचा. या उपायाला आधुनिक आहार तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. आहार तज्ज्ञ अनिता जेना यांनी वजन कमी करण्यासाठी, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जिरे पाणी पिण्याचा (cumin detox water for weight loss) उपाय सांगितला आहे. जिरा डिटाॅक्स वाॅटरनं वजन कमी होण्यासोबतच आरोग्यास इतरही फायदे मिळत असल्याचं जेना सांगतात.
Image: Google
जिरा डिटाॅक्स वाॅटर प्यायल्यास..
1. रोज रात्री एक चमचा जिरे 1 कप पाण्यात भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून निम्मं करावं. पाणी गार झालं की गाळून ते प्यावं. जिरा डिटाॅक्स वाॅटरमध्ये एल्डिहाइड, थाइमोल, फाॅस्फरस हे शरीरातीला विषारी घटक बाहेर काढणारे गुणधर्म असतात. आतडे स्वच्छ करुन पचन सुधारण्यासाठी जिरा डिटाॅक्स वाॅटरचा फायदा होतो. आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं जिरा डिटाॅक्स वाॅटर प्यायल्यानं अपचन, जुलाब, उलट्या, मळमळ या पचनाशी निगडित समस्या दूर होतात.
2. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जिऱ्याचं पाणी प्याल्यास पोट फुगणं, पोटात गॅसेस होणं या समस्या दूर होतात.
3. जिरा डिटाॅक्स वाॅटरमध्ये जीवनसत्वं आणि खनिजं शरीरात जातात. या घटकांमुळे चयापचय क्रिया गतिशील होते. यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात.
Image: Google
4. जिऱ्यामध्ये सूजविरोधी गुणधर्म असतात. म्हणूनच जिरा डिटाॅक्स वाॅटर प्यायल्यानं पोट फुगण्याची समस्या निर्माण होत नाही.
5. जिऱ्यामध्ये क जीवनसत्व, लोह आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतात. जिऱ्यामध्ये विषाणू आणि जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. वजन आणि पोट कमी करण्यासाठी म्हणून उपयुक्त असलेलं जिरा डिटाॅक्स वाॅटर रोज प्यायल्यानं सर्दी, खोकला, वातावरण बदलल्यानं होणारे त्रास होण्याचा धोका टळतो. एकूणच आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी , वजन आणि पोट कमी करण्यासोबतच निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेला फिटनेस कमावण्यासाठी जिरा डिटाॅक्स वाॅटर रोज पिण्याचा सल्ला आहार आणि पोषण तज्ज्ञ अनिता जेना देतात.