Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

Which Is More Beneficial- Curd or Buttermilk: दही आणि ताक सारखंच तर आहे. दोन्हींपैकी काहीही खाल्लं तरी काय फरक पडणार, असं तुम्हालाही वाटत असेल, तर तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला एकदा वाचाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 04:15 PM2022-09-19T16:15:44+5:302022-09-19T16:19:45+5:30

Which Is More Beneficial- Curd or Buttermilk: दही आणि ताक सारखंच तर आहे. दोन्हींपैकी काहीही खाल्लं तरी काय फरक पडणार, असं तुम्हालाही वाटत असेल, तर तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला एकदा वाचाच.

Curd or Buttermilk? Which is more healthy? Who should avoid and who should have curd or buttermilk? | दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

Highlights ताक, दही किंवा योगर्ट कुणी खावं, कुणी ते खाणं टाळावं, त्यांचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात?

 ताक काय किंवा दही काय, सारखंच तर आहे, असं अनेकांना वाटतं. काही जणांना तर योगर्ट आणि दही म्हणजे एकच पदार्थ, असंही वाटतं. पण दिसायला किंवा चवीला जरी सारखे असतील, त्यांचे स्त्रोत तरी एकच असतील तरी ताक, दही आणि योगर्ट (difference between curd, yogurt and butter milk) हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे असून त्यांचे शरीरावर खूप वेगवेगळे परिणाम होतात. म्हणूनच ताक, दही किंवा योगर्ट कुणी खावं, कुणी ते खाणं टाळावं, त्यांचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, याची आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल यांनी दिलेली माहिती. ही माहिती त्यांनी drdimplejangda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

 

दही आणि योगर्ट 
- दह्यामध्ये lactobacillus तर योगर्टमध्ये Lactobacillus Bulgaris आणि Streptococcus Thermophilus हे दोन बॅक्टेरिया असतात. जेव्हा आपण दही किंवा योगर्ट खातो, तेव्हा हे जिवंत बॅक्टेरिया थेट आपल्या पोटात जातात. त्यांचा पचनासाठी उपयोग होतो. 

 

दही खाणे कुणी टाळावे?
१. स्थूल लोकांनी, कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी आणि अर्थरायटीसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दही खाणे टाळावे.

२. रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. कारण त्यामुळे सर्दी, खोकला, सायनस असा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी खायचंच असेल तर त्यात थोडी मिरेपूड किंवा मेथी दाणे टाकून खावे.

शांत झोप लागतच नाही? प्या झोपेचा चहा! 'स्लीप टी' चे ५ जबरदस्त फायदे

३. वेगवेगळ्या ग्रेव्हीमध्ये दही टाकले जाते. असे करणे टाळावे. कारण त्यामुळे दह्यातले उपयुक्त बॅक्टेरिया नष्ट होऊन जातात. 

४. ज्यांना त्वचेचे वेगवेगळे विकार असतात, डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास असतो, त्यांच्यासाठीही दही खाणे याेग्य नाही.

 

ताक कुणासाठी फायदेशीर
१. वरील प्रकारचे त्रास ज्यांना असतात, त्यांच्यासाठी दह्याऐवजी ताक हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.

२. आरोग्यदायी ताक करण्यासाठी दोन टीस्पून दही किंवा योगर्ट घ्यावं. त्यात एक ग्लास पाणी, चिमुटभर जिरेपूड, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालावी. 

नवरात्री 2022 : ९ दिवस- ९ रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? सेव्ह करा हा कलर चार्ट

३. दही किंवा योगर्टपेक्षा ताक पचायला अधिक हलकं असतं. 

४. कफ, पित्त आणि वात या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी ताक फायदेशीर असतं.

५. भूक न लागणे, झोप न येणे, ॲनिमिया असे त्रासही नियमित ताक प्यायल्याने कमी होतात. 

 

Web Title: Curd or Buttermilk? Which is more healthy? Who should avoid and who should have curd or buttermilk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.