दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी चांगलं असतं आणि ताक पिणं कोणाला फायदेशीर ठरतं? या दोन्ही पदार्थांपैकी कोणता पदार्थ आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्यासाठी अधिक चांगला आहे हे प्रत्येकजण अगदी सहज ओळखू शकतो (Health Tips About Curd And Buttermilk). ते कसं याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा बघाच..(curd or buttermilk which one is more suitable for you as per your health?)
दही आणि ताक यापैकी कोणता पदार्थ तुमच्यासाठी अधिक चांगला?
दही किंवा ताक यापैकी कोणता पदार्थ घेणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगला असतो, याविषयीची माहिती डॉक्टरांनी dimplejangdaofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यासाठी त्यांनी ३ महत्त्वाच्या गोषटी सांगितल्या आहेत.
शरीरातला हार्मोनल बॅलेन्स बिघडला हे सांगणारी ४ लक्षणं! त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
१. सगळ्यात पहिलं म्हणजे दही पचायला थोडं जड असतं. त्यामुळे ते रात्रीच्यावेळी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्याउलट ताकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं.
सिंधी कढी रेसिपी: करिना कपूर, सोनाक्षी सिन्हासह बॉलीवूड सेलिब्रिटींना आवडणारा खास पदार्थ
शिवाय ताकामध्ये आपण मीठ, जिरेपूड, मिरच्या, कोथिंबीर असे पचनासाठी पुरक पदार्थ घालतो. त्यामुळे ते अधिक पाचक होतं. म्हणूनच ज्यांना पचनाचा त्रास असतो अशा लोकांनी दही खाण्याऐवजी ताक प्यावं.
२. दह्याला आपण थंड पदार्थ समजतो. पण खरंतर ते उष्ण असतं. त्यामुळे ज्यांना ॲसिडीटी, पित्त असा त्रास होतो अशा लोकांनी दही खाणं टाळावं. अशा लोकांनी ताक पिण्यास प्राधान्य द्यावं कारण ताक थंड असतं.
चुडी खनकेगी..!! लग्नसराईत घालण्यासाठी बांगड्यांचे एकदम लेटेस्ट पॅटर्न, हात दिसतील सुंदर- मोहक
३. ज्या लोकांची कफ प्रकृती असते अशा लोकांनीही दही खाणं टाळावं. कारण त्यांना दह्यामुळे सर्दी, शिंका, कफ असा त्रास होऊ शकतो. त्या लोकांना ताक पिणं मात्र चालतं. ताक तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये घेऊ शकता आणि ते कफ, वात, पित्त अशा तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालतं.