वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तर काहीजण डाएटला अधिक महत्व देतात. आयुर्वेदात तुळस आणि कढीपत्ता हे दोन्ही फार महत्वाचे मानले जातात. (How Curry Leaves Can Weight Loss Effectively) एखाद्या जडीबूटीच्या स्वरूपात कढीपत्ता आणि तुळशीचे सेवन केले जाते. याशिवाय कढीपत्ता वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याचे अनेक फायदे सांगितले जातात. (Here Is How You Can Eat Curry Leaves For Weight Loss)
कढीपत्त्याच्या सेवनाने तुम्ही पोटावरील चरबीचे टायर्स कमी करू शकतात. भारतीय घरांमध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि हायपोग्लायसेमिक गुण असतात. ज्यामुळे इंसुलिन एक्टिव्हीटीज वाढतात आणि इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते. (Weight Loss Home remedies)
रिसर्चनुसार कढीपत्त्याचा वापर बीएमआय सुधारण्यासाठी एक सुरक्षित उपाय आहे. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन होते आणि हायपर कोलेस्टेरोलिक घटक कमी होतो. (Ref) रोजच्या स्वयंपाकात रोज ५ ग्रॅम कढीपत्त्याच्या पावडरचे सेवन केल्यास शरीराचा मेटाबॉलिझम ओव्हरऑल आरोग्य सुधारण्यासही मदत होते. तुळस खावी की कढीपत्ता याबाबत अनेकांना कन्फ्यूजन असते.
औषधी गुणांनी परिपूर्ण कढीपत्ता अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतो. कढीपत्त्यात व्हिटामीन, मिनरल्स, ल्युटिन, बीटा कॅरोटीन आणि जेक्सान्थिन, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन असते. ज्यामुळे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे कॅन्सर, आर्थरायटिस, रेस्पिरेटरी, युरीन, पोट आणि स्किन इन्फेक्शन पासून लढण्यास मदत होते. कढीपत्त्यासह तुळशीच्या पानांचे सेवन पोटासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. रोज सकाळी सकाळी तुळशीची ३ ते ४ पानं खाल्ल्याने पचनाचे त्रास दूर होतात.
कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर ठरतो? (Curry Leaves For Weight Loss)
कढीपत्त्यामध्ये आढळणारे हाय फायबर कंटेंट कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज तुटण्याची प्रक्रिया स्लो करतात. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. कढीपत्त्यात फायबर्ससह प्रोटीन्स, फॉस्फरेस, कॅल्शियम आणि मल्टीव्हिटामीन ही तत्व मिळतात. रोज ५ ते ६ कढीपत्ते चावून हलक्या गरम पाण्यासोबत प्या. रोज हा उपाय केल्यान वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या तुलनेत कढीपत्त्याच्या सेवनाने वजन सहज कमी होण्यास मदत होते.