Join us  

पोट, मांड्यांची चरबी फार वाढली? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा असा उपयोग करा; स्लिम-मेंटेन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:38 AM

Curry Leaves to Reduce Belly Fat (kadhipatta ne vajan kase kami karave) : पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.

पोटाची चरबी कमी करणं खूप कठीण असते. (Fitness Tips) लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना फॅट्स कमी करण्यासाठी व्यायाम करणंही तितकंच महत्वाचे असते. (Weight L0ss Tips) होममेड ड्रिंक्स, मसालेदार हर्ब्स फायदेशीर ठरतात. (Curry Leaves to Reduce Belly Fat) किचनमधील पदार्थांचा योग्य वापर न केल्यास पोट कमी करणं कठीण होऊ शकतं. कढीपत्त्याचा वापर फोडणीकरीत केला जातो. (Surprising Benefits of Curry Leaves) पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या हॉर्मोन्स आणि गट्स हेल्थच्या तज्ज्ञ आहेत. (Kadhipatta For Weight Loss)

बेली फॅट कमी करण्यासाठी कढीपत्ता कसा फायदेशीर ठरतो? (Kadhipatta For Weight Loss)

1) वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं बरीच फायदेशीर ठरतात यात व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी आणि अनेक एंटी ऑक्सिडेंट्स असतात.

2) यात कॉपर, आयर्न, फायबर्सचे प्रमाण जास्त असते. कढीपत्त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. याशिवाय शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते. 

ऐन सणासुदीला पांढरे केस डोकावतात? चमचाभर चहाचा खास उपाय-डायशिवाय केस होतील काळे

3) कढीपत्ता खाल्ल्याने पोटाला गारवा मिळतो. पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता बॅड कोलेस्टेरॉलही कमी करतो. यात एंटी इफ्लेमेटरी प्रॉपर्टिज असतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठीही पानं फायदेशीर ठरतात.

4) ३ ते 4  कढीपत्ते रिकाम्यापोटी चावा. तुम्ही या ज्यूसचे सेवनही करू शकता. १० ते १५ कढीपत्ते पाण्यात घालून उकळवून घ्या. नंतर गाळून यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या.

5) तुम्ही कढीपत्त्याचा चहासुद्धा बनवू शकता. यासाठी १० ते १५ कढीपत्ते आणि १ छोटा तुकडा आलं पाण्यात घालून उकळवून घ्या गाळून लिंबाच्या रसात मिसळून याचे सेवन करा. 

पोटाचा घेर वाढू नये यासाठी उपाय (How to Lose  Belly Fat)

१) पोट कमी करण्यासाठी वॉक करणं गरजेचं आहे.  रोज चालल्याने पोटाची चरबी अनेक पटींनी कमी होऊ शकते.  या उपायांनी इंचेचमध्ये शरीर कमी होते. तुम्ही पार्क किंवा घरातही वॉक करू शकता. 

२) सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.  यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. सकाळी गरम पाण्याचे सेवन केल्यानं अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होईल.

काजू-बदामापेक्षा जास्त प्रोटीन देतो हा पदार्थ; रोज खा-स्वस्तात मिळेल पोषण, कॅन्सरचा टळेल धोका

३) दिवसभरात एकतरी सिझनल फ्रुट् खा. पेअर, सफरचंद ही फळं फायबर्सचा चांगला स्त्रोत आहेत.  सकाळी ११ ला किंवा संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान तुम्ही या फळांचे सेवन करू शकता.

४) प्रोटीन्स फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात यातून शरीराला भरपूर उर्जा मिळते. मसल्सही मजबूत होतात. याशिवाय तुम्ही दूध, ड्राय फ्रुट्स अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स