आजकाल प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी योग्य खाणं पिणं आणि वर्कआऊट गरजेचा असतो (Cycling Vs Skipping). वर्कआऊटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांचा समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी सायकलिंग आणि स्किपिंग हे दोन्ही व्यायाम उत्तम मानले जातात. अधिकाधिक लोक गोंधळलेले असतात की त्यांना दोरी उड्या आवडतात की सायकलिंग. (Cycling Vs Skipping For Weight Loss)
हे दोन्ही व्यायाम उत्तम परिणाम देतात. योग्य व्यायाम आणि वर्कआऊट रूटीन फॉलो करून तुम्ही व्यायाम करू शकता. दोरी उड्या किंवा हाय इंटेसिटी व्यायाम करून तुम्ही अधिकाधिक कॅलरीज बर्न करू शकता. सायकलिंग एक लो इंपॅक्ट पर्याय आहे. लॉन्ग कार्डीओ सेशनमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. वेट लॉससाठी कोणता व्यायाम करायला हवा ते समजून घेऊ. (Which Is Better For Melting Belly Fat)
कॅलरी बर्नसाठी दोन्ही व्यायाम उत्तम
सायकल चालवणं किंवा स्किपिंग करणं हे दोन्ही व्यायाम कॅलरीज बर्न करण्यासाठी उत्तम आहेत. जर कमी वेळेत इंटेस कॅलरी बर्न करायचे असती तर स्किपिंग जास्त उत्तम ठरतं. सायकलिंग केल्यानं तुम्ही ३०० ते ८०० कॅलरीज बर्न करू शकता. सायकलिंग स्पीड, पॅडलिंग यावर अवलंबून असेल. १५ मिनिटांचे स्किपिंग सेशन केल्यास तुमचा वेग आणि इंटेसिटीच्या आधारावर २०० ते ३०० कॅलरी बर्न होतील.
मसल टोनिंग आणि स्ट्रेंथ
मसल टोन होण्यासाठी आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सायकलिंग, स्किपिंग हे व्यायाम उत्तम आहेत. सायकलिंग करून तुम्ही पाय, मांड्या, ग्लुट्स चांगले बनवू शकता. बॉडी बॅलेन्ससाठी तसंच कोअर आणि बॅक एंगेज ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
तुम्ही वेगवेगळ्या परीसरात सायकल चालवू शकता. स्किपिंग केल्यानं संपूर्ण शरीर जसं की हात, खांदे, कोअर आणि पायांवर दबाव येतो. टोनिंगबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही दोरी उड्यांची निवड करू शकता. स्टॅमिना वाढवण्यासाठी सायकलिंग उत्तम पर्याय आहे.
सायकलिंग आणि दोरी उड्यांमध्ये कशाची निवड करावी हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला एक लोक इंपॅक्ट कार्डिओची निवड करायची असेल तर तुम्ही दीर्घकाळ सायकलिंगची निवड करू शकता. जर तुमच्याकडे कमीत कमी वेळ असेल तर तुम्ही हाय इंटेसिटी आणि स्पेस सेविंग वर्कआऊट करू शकता. तसंच स्किपिंग केल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.