रात्रीचे जेवण घेण्याची आदर्श वेळ कोणती? रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये किती तासांचे अंतर असावे, अशी सगळी माहिती बऱ्याच जणांना असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाबाबत ज्यांना शक्य असते ते बरेच जण काटेकोर असतात. पण दुपारच्या जेवणाची अशी योग्य वेळ कोणती, याचा अंदाज मात्र अनेकांना नाही. दुपारच्या जेवणाच्या बाबतीतही वेळा पाळल्या तर ॲसिडिटी होणे, सुस्ती येणे, संध्याकाळच्या वेळेस अंग जड पडणे, रात्री जेवणाची इच्छा न होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे (Delayed lunch causing acidity, headache and gas) असे त्रास होत नाहीत. म्हणूनच दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आणि जर जेवायला उशीर होत असेल तर त्या वेळेत नेमकं काय करावं (remedies for acidity), याविषयी ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा वाचा.
ऋजुता यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणतात की दुपारच्या जेवणाची आदर्श वेळ स. ११ ते दु. १ यादरम्यान आहे. यावेळेत जर आपण जेवलो तर वर सांगितलेले कोणतेही त्रास सहसा होत नाहीत.
आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ
कामामुळे बऱ्याच जणांना ही वेळ पाळणं शक्य नसतं. असं झाल्यास काय करावे याचे त्यांनी सांगितलेले ३ उपाय पुढीलप्रमाणे...
दुपारचं जेवण लांबल्यास काय उपाय करावे?
१. शक्यतो स. ११ ते दु. १ या दरम्यानच जेवायला बसण्याचा प्रयत्न करा. पण ते नाहीच जमलं तर या वेळेदरम्यान एका जागी शांतपणे बसा आणि एक क्लास पाणी सावकाश प्या. पाणी पिताना धावपळ गडबड टाळा.
२. दुसरा उपाय म्हणजे एखादं मगजदार फळ खा. उदाहरणार्थ केळी, सिताफळ, पपई, चिकू, सफरचंद अशी फळं तुम्ही खाऊ शकता.
केस वाढतच नाहीत, कमी वयात पांढरे झाले? ५ योगासनं करा, केस हाेतील मजबूत- लांब, गळणंही होईल कमी
३. दुपारचं जेवण उशीरा झाल्यास जेवणाचा शेवट एक चमचा गूळ आणि तूप एकत्रितपणे खाऊन करा. असे केल्याने ॲसिडिटीचा त्रास होणार नाही, डोकं जड पडून सुस्ती येणार नाही.