Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फराळ खाऊन वजन वाढलं, थंडीही आली मस्त; करा  5 दिवसांचं डिटॉक्स - वेटलॉस डाएट!

फराळ खाऊन वजन वाढलं, थंडीही आली मस्त; करा  5 दिवसांचं डिटॉक्स - वेटलॉस डाएट!

दिवाळीतल्या फराळाच्या पदार्थांनी वजन वाढल्याचं आपल्याला आता जाणवू लागलेलं असेल. आता हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कडक डायटिंगची, उपाशी राहाण्याची गरज नाही. पण आहार तज्ज्ञ सांगतात की दिवाळीच्या काळात खाल्लेल्या गोड, तेलकट पदार्थांमुळे, बाहेर अरबट चरबट खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटकही जमा होतात. त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी म्हणून दिवाळीनंतरचं डीटॉक्स आणि वेटलॉस डाएट करणं गरजेचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 03:03 PM2021-11-11T15:03:02+5:302021-11-11T15:14:16+5:30

दिवाळीतल्या फराळाच्या पदार्थांनी वजन वाढल्याचं आपल्याला आता जाणवू लागलेलं असेल. आता हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कडक डायटिंगची, उपाशी राहाण्याची गरज नाही. पण आहार तज्ज्ञ सांगतात की दिवाळीच्या काळात खाल्लेल्या गोड, तेलकट पदार्थांमुळे, बाहेर अरबट चरबट खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटकही जमा होतात. त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी म्हणून दिवाळीनंतरचं डीटॉक्स आणि वेटलॉस डाएट करणं गरजेचं आहे.

Detox Diet After Diwali: Gained weight by eating Diwali faral? Follow a 5 Day Detox - Weight Loss Diet! | फराळ खाऊन वजन वाढलं, थंडीही आली मस्त; करा  5 दिवसांचं डिटॉक्स - वेटलॉस डाएट!

फराळ खाऊन वजन वाढलं, थंडीही आली मस्त; करा  5 दिवसांचं डिटॉक्स - वेटलॉस डाएट!

Highlightsदिवाळीनंतर शरीर विषमुक्त होणं गरजेचं असतं तरच शरीरातील सर्व अवयव त्यांचं कार्य व्यवस्थित करुन आरोग्य सुदृढ ठेवतात.आहारात दालचिनी, तुळस यांचा समावेश असलेलं डीटॉक्स वॉटर, सलाड, स्मूदी, हिरव्या भाज्यांचा रस घेतल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडतात.डीटॉक्स आहाराचा उपयोग केवळ वजन कमी करण्यासाठीच नसतो तर शरीर आतून स्वच्छ करण्यासाठीही होतो.

 आपण वर्षभर आहाराचे आणि आरोग्याचे नियम पाळत असलो तर सणासुदीला जराही अपराध भाव न बाळगता मिठाया, तळलेले पदार्थ यांचा मनमुराद आनंद घेऊ शकतो असं आहारतज्ज्ञांनी दिवाळीपूर्वीच सांगितलेलं होतंच. दिवाळी चार दिवसांची असली तरी घरी बनवलेला किंवा विकत आणलेला फराळ त्यापुढे दोन एक आठवडे तरी पुरतोच.

Image: Google

दिवाळीनंतर बॉडी डीटॉक्स

दिवाळीनंतर शरीर विषमुक्त होणं गरजेचं असतं तरच शरीरातील सर्व अवयव त्यांचं कार्य व्यवस्थित करुन आरोग्य सुदृढ ठेवतात. शरीराला सतत बाहेरुन डीटॉक्स घटक पुरवण्याची गरज नसते. कारण आपलं यकृत, किडन्या, त्वचा, लसिका ग्रंथी हे शरीरातील घाण, धोकादायक अन विषारी घटक बाहेर काढून टाकत असतात. पण दिवाळीमधे गोड, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ जास्त खाण्यात येतात, हवेत कोरडेपणा आल्यानं आणि फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलेलं असतं, फास्ट फूड भरपूर प्रमाणात खाऊन झालेलं असतं त्यामुळे शरीरात कमी वेळात जास्त विषारी घटक साठतात. त्याचा परिणाम शरीरातील आतील इंद्रियांच्या कार्यावर होतो. यामुळे आजारी पडणे, मनावरचा ताण वाढणे या गोष्टी घडतात. शरीरातील विषारी घटकांचा निचरा होण्यासाठी सर्व इंद्रियांनी आपलं काम चोख करण्यासाठी त्यांना पुन्हा चालना मिळणं आवश्यक आहे. शरीराचं डीटॉक्स केलं की सर्व इंद्रियांवरचा विषारी घटकांमुळे आलेला ताण कमी होवून ते पूृर्ण क्षमतेने काम करु लागतात. यासाठी दिवाळीनंतर डीटॉक्स करण्याला महत्त्व आहे. यासाठी डीटॉक्स प्रक्रियेला मदत करणारा आहार घेणे गरजेचं असतं.

 आहारात दालचिनी, तुळस यांचा समावेश असलेलं डीटॉक्स वॉटर, सलाड, स्मूदी, हिरव्या भाज्यांचा रस घेतल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडतात.तसेच आपली पचनक्रियाही सुधारते. यामुळे या डीटॉक्स आहाराचा उपयोग केवळ वजन कमी करण्यासाठीच नसतो तर शरीर आतून स्वच्छ करण्यासाठीही होतो.

Image: Google

आहारात काय असायला हवं?

दिवाळीनंतरचे पाच ते सहा दिवस हे जर शरीर शुध्दीकरणाला दिले तर शरीरावर झालेला वाईट दिवाळी इफेक्ट कमी होतो, त्याचा फायदा वजन कमी करण्यासही होतो. यामुळे दिवाळीनंतर पाच दिवस काही घटकांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात करणं आवश्यक आहे.
1. पालेभाज्या: पालक, तांदूळका, राजगिरा यासारख्या पालेभाज्या खनिजयुक्त असतात. पालेभाज्यांमधील मॅग्नेशियम आणि लोहामुळे शरीर आणि मनावरचा ताण मोकळा होतो. पालेभाज्यांमुळे शरीरात ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित राहाते. या पालेभाज्यांमधे तंतूमय घटक अर्थात फायबर जास्त असल्यानं पोट दीर्घकाळ भरलेलं राहातं. वारंवार भूक लागून खाल्लं जात नसल्यानं वजनही वाढत नाही, उलट ते कमीच होतं.
2. प्रोबायोटिक्स: पचन सुधारण्यासाठी , आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासठी आहारात घरी विरजलेल्या दह्याचा उपयोग करावा. आतड्यांच्या आरोग्यात असमतोल निर्माण झाल्यानं वजन वाढतं. दही सारखे प्रोबायोटिक्स हे आतड्यांमधे समतोल निर्माण करतं.
3. शेंगवर्गीय भाज्या आणि कडधान्यं: शेंगा, मटार दाणे, डाळी यांच्यात मोठ्या प्रमाणात पथिनं, फायबर आणि कॉमपलेक्स कबरेदकं असतात. हे घटक शरीरात लवकर विरघळत नाही. शेंगवर्गीय भाज्यांमधलं प्रथिनं स्नायुंची ताकद वाढवतात. अन्नातून मिळणारी साखर शोषून घेण्याची किंवा कर्बोदकांची पातळी कमी करतात. या पाच दिवसाच्या काळात रसायनयुक्त साखर खाण्यापेक्षा फळं, भाज्या यातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते आणि फायबरही पुरवते.
4. तळलेले पदार्थ वर्ज्य : दिवाळीनंतरचं हे पाच दिवसांचं डाएट पाळताना तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं. कारण पदार्थ जास्त पाणी पिण्यास भाग पाडतत त्यामुळे चरबी वाढवणार्‍या पेशींची संख्या वाढते.
डाएटच्या पाच दिवसात नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात शरीर डीटॉक्स करणारे, वजन कमी करणारे, पोट भरणारे आणि रुचकर पदार्थ यांचा समावेश असावा.

Image: Google

सकाळी उठल्यानंतर डीटॉक्स वॉटर

पाच दिवस रोज सकाळी डीटॉक्स वॉटर घ्यावं. यासाठी पाव चमचा दालचिनी, अर्धा चमचा मेथी, 3-4 पुदिन्याची पानं ही रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत घालावेत. आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हा काढा घ्यावा.

नाश्त्याला काय?

आहर तज्ज्ञांनी शरीर डीटॉक्स होवून वजन कमी करण्यासाठी सुचवलेल्या आहारात  नाश्त्यासाठीचे वेगवेगळे पर्याय सुचवले आहेत.
1. एक कप सायीचं दूध, ओटस आणि 5 भिजवलेले बदाम.
2. ओटसचं धिरडं, ताक, 5 बदाम आणि 2 अक्रोड
3. पोहे, ताक, 5 बदाम आणि 2 अक्रोड
4. केळ ओटस स्मूदी ( एक केळ, ग्लासभर दूध आणि 5 बदाम यांचा उपयोग करुन केलेली)
5. बेसन ढोकळा , ताक आणि 5 बदाम
6. रव्याचा उपमा/सांजा, ताक आणि 5 बदाम खावेत

Image: Google

दुपारच्या जेवणाला काय?

दुपारी जेवणाआधी भूक लागल्यास 1 कोणंतही हंगामी फळ खावं.
1. 1 चमचा इसबगोल पावडर घालून 1 ग्लास पाणी, 2 पोळ्या, एक वाटी डाळ, एक वाटी दही .
2. 1 चमचा इसबगोल पावडर, भाज्या घातलेले दोन दशम्या/ थालिपीठ आणि दही
3. 1 चमचा इसबगोल पावडर, एक वाटी ओटसची लापशी आणि ताजं दही.
4. 4 इडल्या, सांभार आणि पुदिन्याची चटणी
5. 1 वाटी हिरव्या मुगाचे चाट आणि 1 ग्लास ताक
6. भाज्या घालून पोहे आणि दही.
आहारतज्ज्ञ म्हणतात दुपारच्या जेवणात एक वाटी सलाड खायलाच हवं.

चहाच्या वेळेत

1 कप साखर न घातलेला चहा त्यासोबत एक किंवा दोन बिस्किटं/ चहा आणि कुरमुर्‍यांचा चिवडा/ चहा आणि एक वाटी मखाना हे पर्याय आहेत.
रात्री जेवणाआधी
रात्री जेवणाआधी एक वाटी भाज्यांचं सूप/ कॉर्न सूप घ्यावं.

Image: Google

रात्रीच्या जेवणाला काय?

1. 1 चमचा इसबगोल घालून पाणी, परतलेल्या भाज्या ( सिमला/ ब्रोकोली/ मशरुम्स
2. 2 ओटसचे धिरडे आणि पुदिना चटणी
3. काळ्य चण्यांचं सॅलेड
4. 1 वाटी उकडलेल्या भाज्या आणि 1 वाटी ओटसची लापशी
5. 2 वाट्या मुगाचं कढण आणि 1 वाटी भाजी
6. भाज्या घातलेला रेड सॉसमधील पास्ता

रात्रीच्या जेवणानंतर

रात्री जेवणानंतर झोपण्याआधी एक कप पाण्यात थोडी कढीपत्त्याची पानं उकळून तो काढा पिल्यास वजन कमी होण्यास फायदा मिळतो.

Image: Google

पाच दिवसांच्या डाएटमधे लक्षात ठेवा..
डाएटिंग करताना मधून मधून भूक लागण्याची शक्यता असते. यासाठीच पोट दीर्घकाळ भरुन ठेवणारे, प्रथिनं, फायबरयुक्त , नैसर्गिक साखर असलेले पदार्थ आहारात असले तर पाच दिवसांचं हे डाएटिंग व्यवस्थित पार पडतं. प्रथिनं, फायबर, फळांमधील नैसर्गिक साखर हे भुकेविरुध्द लढतात. यामुळे दिवसभर सारखी भूक लागत नाही. सतत गोड, खारट पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. मधे भूक लागलीच तर भोपळ्याच्या बिया, राजगिरा, चिया सीडस, थोडं डार्क चॉकलेट हे पदार्थ खावेत. यात प्रथिनं, मॅग्निज, झिंक, लोह, नियासिन, तांबं, फॉस्फरस, फ्लेवोनॉइडस आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे या पाच दिवसांच्या डाएटमधे शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळते, मूड चांगला राहातो, चिडचिड होत नाही.

Web Title: Detox Diet After Diwali: Gained weight by eating Diwali faral? Follow a 5 Day Detox - Weight Loss Diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.