Join us  

लठ्ठपणाशी फाईट करणारी ५ पेयं, थुलथुलीत पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा, वजन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2024 3:08 PM

Detox Drinks for Boosting Metabolism and Weight Loss : वाढलेल्या वजनामुळे हैराण असाल, तर दिवसाची सुरुवात 'या' ५ पेयांनी करा..

आजकाल बरेच जण वजन कमी करण्याच्या समस्येने त्रस्त आहेत (Weight Loss). वजन कमी करणं हे लोकांना हे टास्क वाटत आहे. वजन कमी करण्यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो (Fitness). पण तरीही वेट लॉस करणं कठीण वाटतं. वजन कमी करण्यासाठी आपण डाएट आणि व्यायामावर भर देतो (Detox Drinks).

पण तरीही वेट लॉस करताना अडचण निर्माण होत असेल तर, वेट लॉस ड्रिंक आपल्याला नक्कीच मदत करेल. वजन कमी करण्यासाठी कोणते पेय प्यावे? सकाळी हे वेट लॉस पेय प्यायल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतील? पाहूयात(Detox Drinks for Boosting Metabolism and Weight Loss).

कोमट पाणी

पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर. पण आपल्याला कोमट पाणी पिऊन वजन कमी करण्याचे फायदे ठाऊक आहे का? मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांनी इंडिया टुडे. इन ला दिलेल्या माहितीनुसार, गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय यामुळे पचनक्रियाही सुधारते.

व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यासोबतच ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन नावाचे तत्व चयापचय वाढवते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात. आपण चहाऐवजी ग्रीन टी पिऊ शकता.

मेथीचे पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, आणि वारंवार भूकही लागत नाही. याशिवाय मेथीचे पाणी नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

आलं पाणी

आल्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात थोडे आले मिसळून प्यायल्याने पचनक्रिया वेगवान होते आणि शरीरातील इन्शुलिनची पातळीही नियंत्रित राहते.

चिया सीड्स पाणी

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त त्यात प्रोटीन, ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर असतात. शिवाय फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. आपण चिया सीड्सचा वापर पाण्यात नसून, इतरही काही पदार्थांमध्ये करू शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स