निरोगी आरोग्यासाठी, प्रसन्न चेहर्यासाठी, परफेक्ट बॉडी शेपसाठी आपलं शरीर बाहेरुन नाही तर आतून स्वच्छ असणं गरजेचं असतं. त्यासाठी गरजेचे असतात ते डिटॉक्स ड्रिंक्स. पण डिटॉक्स ड्रिंक्स म्हणजे काहीतरी बेचव पेय नाही. डिटॉक्स ड्रिंक प्यायला मजा यावी, ते प्यावंसं वाटावं अशा प्रकारेही ते करता येतं.
Image: Google
स्टार फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन वेगवेगळ्या आरोग्यदायी रेसिपी शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या दोन रेसिपीज सध्या खूपच चर्चेत आहेत. एक म्हणजे डिटॉक्स स्मूदी आणि गिल्ट फ्री डेझर्ट. काय आहेत हे दोन पदार्थ?
Image: Google
यास्मिन कराचीवाला यांनी शेअर केलेले हे दोन पदार्थ म्हणजे खाण्या पिण्याची हौस भागवण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवणारे,पचन क्रिया व्यवस्थित ठेवणारे, चयापचय क्रियेत सुधार घडवून वजन कमी करण्यास मदत करणारे आहेत.
अगदी कमीत कमी गोष्टींतून उत्तम चवीच्या पौष्टिक डिशेस ही यास्मिन कराचीवाला यांची खासियत आहे. या दोन पदार्थांचे साहित्य आणि कृती बघितल्यास याची नक्कीच खात्री पटेल.
पचनात काही गडबड झाल्यासारखी वाटत असेल, मूड जरा डल झाला असेल तर तेव्हा शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आली समजावं. यासाठी अननस केळाची डिटॉक्स स्मूदी तयार करता येते. ही स्मूदी संध्याकाळी भूक लागल्यानंतर स्नॅक्सला हेल्दी आणि चविष्ट पर्याय म्हणूनही पिता येते. यास्मिन कराचीवाला म्हणतात की, आठवड्याची हेल्दी आणि उत्तम सुरुवात करायची असेल तर अननस केळाची डिटॉक्स स्मूदी ही प्यायलाच हवी.
https://www.instagram.com/reel/CW0tY2WI2Bp/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">https://www.instagram.com/reel/CW0tY2WI2Bp/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">View this post on Instagram
अननस केळाची स्मूदी
अननस केळाची स्मूदी करण्यासाठी अर्धा कप फ्रोझन अननसाचे तुकडे, अर्धा कप पालक, अर्धं सफरचंद, अर्धा कप फ्रोझन केळ, अर्धा कप पाणी घ्यावं. सर्व साहित्य त्यासोबतच स्मूदी गार आवडत असल्यास बर्फाचे तुकडे घालून ब्लेण्डरनं मऊसर ब्लेण्ड करुन घ्यावं. या स्मूदीला अननस आणि केळाची मस्त चव येते. ही स्मूदी डिटॉक्स ड्रिंक आहे हे पितांना वाटणारही नाही इतकी ती चविष्ट लागते.
Image: Google
समोर मिठाई दिसली की न राहवून ती अधाशीपणे संपवून टाकण्याची सवय अनेकांना असते. पण मिठाई संपवली, की मग अरे बापरे हे आपण काय केलं?’ असा पश्चाताप आणि अपराधभाव निर्माण होतो. साखर घातलेल्या सर्व मिठाया वजन वाढव्ण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मिठाया अडचणीच जास्त आणतात. पण वजन न वाढण्याची खात्री असलेल्या, खाल्ल्यानंतर पश्चातापाची भावना न निर्माण करणार्या मिठायाही असतात. यास्मिन कराचीवाला यांनी आपल्या इन्स्टापोस्टद्वारे अशाच ‘गिल्ट फ्री डेझर्ट’ची ओळख करुन दिली आहे. ही मिठाई तयार करणं अगदी सोपं आहे. यासाठी नारळाच्या दुधाचं दही, अक्रोडचे एकदम बारीक तुकडे,बदाम, क्रॅनबेरीज, भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट चिप्स एवढं साहित्य लागतं.
https://www.instagram.com/reel/CVIe9MqosbV/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">https://www.instagram.com/reel/CVIe9MqosbV/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">View this post on Instagram
गिल्ट फ्री डेझर्ट कसं करावं?
गिल्ट फ्री डेझर्ट तयार करण्यासाठी 2-3 मोठे चमचे नारळाचं दही एका ताटलीला लावावं. त्यावर अक्रोडाचा चुरा, कॅनबेरीज, बदामाचे काप, भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट घालावं. ही ताटली फ्रिजरमधे काही तास ठेवावी. दोन तीन तासानतर नारळाचं दही आणि त्यावर टाकलेलं जिन्नस सेट होतं. फ्रिजमधून काढतो तेव्हा हे ताटलीतलं मिश्रण वडीसारखं कडक होतं. जे सहज तोडून खाता येतं. हा पदार्थ खाऊन भूक मस्त भागते.