Join us  

रात्रीच्या जेवणानंतर फक्त २ मिनिटं हे काम करा; डायबिटीस कधीच वाढणार नाही-निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 12:27 PM

Diabetes control tips : (Sugar kashi kami karavi) : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही जसा वेळ मिळेल तसे ३० ते ६० मिनिटं वॉक करू शकता. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

जगभरातील लोकांमध्ये डायबिटीसचा गंभीर आजार पसरत आहे. लाखो लोकांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. (Diabetes) डायबिटीस हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये लोकांच्या शरीरात इंसुलिन व्यवस्थित तयार होत नाही किंवा इंसुलिन तयार होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. (Sugar kashi kami karavi) यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं म्हणूनच प्रत्येकानेच फिजिकल एक्टिव्हीज करत राहायला हवं. रिसर्चनुसार डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी तुम्ही जेवणानंतप काही गोष्टींची काळजी घेतली तर आजारांपासून बचाव होऊ शकतो. (Lifestyle Changes to Help Control Diabetes)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी २ मिनिटांचे वॉक परिणामकारक ठरते. रिसर्चनुसार संशोधकांनी सांगितले की रात्रीच्या जेवणानंतर फक्त २ ते ५ मिनिटं चालल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते.  (Sugar control tips) यामुळे टाईप २ डायबिटीसचा धोका कमी होतो.

जेवणानंतर काही मिनिटांनी शरीरातील साखरेची पातळी वाढते. हे कंट्रोल केल्यानं आरोग्याला बरेच फायदे मिळतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि डायजेशनच्या समस्येपासून आराम मिळतो. (Two minute walk after dinner reduce diabetes risk  controls blood sugar instatly)

जेवल्यानंतर किती वेळाने वॉक करावे?

१) जेवल्यानंतर वॉक केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. अभ्यासकांच्यामते जेवल्यानंतर  ६० ते ९० मिनिटांच्या आत वॉक करू शकता. यादरम्यान शरीराची ब्लड शुगल लेव्हल उंच स्तरावर असते. 

ना गोळ्या, ना औषधांचा खर्च; रोज खा 'हे' फळ, शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी-फिट राहाल

२) काही मिनिटं वॉक केल्यानं पुरेपूर फायदे मिळू शकतात. तब्येतीला पुरेपूर फायदे मिळण्यासाठी तुम्ही ३० मिनिटं वॉक करू शकता. हार्ट हेल्थ मजबूत राहते आणि फिटनेस सुधारतो. वॉक केल्यानं लठ्ठपणाचा धोकाही टाळता येतो.

3) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही जसा वेळ मिळेल तसे ३० ते ६० मिनिटं वॉक करू शकता. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. डिनरनंतर वॉक केल्यानं सेरोटोनिन हॉर्मोन रिलीज होते. ज्यामुळे चांगली झोप येते. वॉकींगमुळे मेमरी इंप्रुव्ह होते. भूक न लागण्याची समस्या टाळता येते. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही यामुळे चांगले राहते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स