भाज्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. भाज्यांमधून शरीराला आवश्यक खनिजं, जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. पण सर्व भाज्या सर्व परिस्थितीत शरीरास लाभदायकच असतात असं नाही. विशिष्ट प्रकारच्या आजारात विशिष्ट भाज्या (या अंगभूत कितीही पौष्टिक असल्या तरी ) अपायकारक ठरतात. मधुमेहाच्या समस्येत (diabetes) केवळ गोड पदार्थच टाळावेत असं नाही तर भाज्यांची निवड करतानाही ती सजगतेनं करावी लागते. काही भाज्या या मधुमेहाच्या समस्येत वर्ज्य (vegetable should avoid in diabetes) समजल्या जातात. यात बटाटा, मका, वाटाणा आणि भाज्यांचे ज्यूस यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
Image: Google
बटाटा का नको?
मधुमेही रुग्णांनी बटाट्याचं सेवन अजिबात करु नये. कारण बटाट्यातील ग्लायसेमिक इंडेक्स जास्त जास्त असतो. बटाट्यात स्टार्च जास्त प्रमाणात असतो. याचाच अर्थ इतर भाज्यांच्या तुलनेत बटाट्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असतं.
Image: Google
मका खावा सांभाळून!
मका खाणं मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक नसतं. भलेही मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी म्हणजे 52 असतो, म्हणजे रक्तातील साखर लगेच वाढत नाही पण मक्यामध्ये फायबरचं प्रमाण फारच कमी असतं. यामुळे मका मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर नसतो. अर्धा कप मक्यामधून 21 ग्राम कर्बोदकं आणि केवळ 2 ग्रॅम फायबर मिळतं. म्हणूनच मधुमेही रुग्णांनी मका खाणं टाळलेलंच बरं. आणि खायचा झाल्यास त्याचं प्रमाण अत्यंत कमी हवं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
वाटाणाही नको
स्टार्च असलेल्या भाज्यांमध्ये हिरवे वाटाणे उत्तम असले तरी वाटाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 52 इतका जास्त असतो. त्यामुळे वाटाणे खाल्ल्यानं मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर वाढते. वाटाण्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. एक कप वाटाण्यामध्ये 20 ग्रॅम कर्बोदकं असतात. त्यामुळेच वाटाणा टाळता आला तर अवश्य टाळावा किंवा खाल्ल्यास तो अगदी कमी खावा.
Image: Google
भाज्यांचे ज्यूस टाळा !
भाज्यांचे ग्रीन ज्यूस आरोग्यास फायदेशीर असतात. पण मधुमेही रुग्णांसाठी जेवढ्या भाज्या फायदेशीर असतात तितके भाज्यांचे ज्यूस फायदेशीर नसतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जेवढ्या प्रमाणात फायबरची आवश्यकता असते तितके फायबर भाज्यांच्या ज्यूसमधून मिळत नाही. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी भाज्यांचे ज्यूस टाळून भाज्या खाणं योग्य पर्याय आहे.