Join us  

डायबिटिस किंवा शुगर जास्त असणाऱ्यांनी ७ फळं खाणं टाळावंच; सणसमारंभाच्या दिवसांत आजारी पडून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 4:37 PM

Tips For Diabetes Patients: सणवाराच्या दिवसांत तब्येतीकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण वाढलेलं असतंच. म्हणूनच शुगरचा त्रास असेल तर चटकन एखादं फळं तोंडात टाकण्याआधी थोडं थांबा...

ठळक मुद्देसणवाराच्या दिवसांत गोड पदार्थ पोटात जाणार असतील, तर निदान शुगर वाढविणारी फळं खायचं टाळणं, एवढं तर आपण निश्चितच करू शकतो.

तब्येतीसाठी फळं खाणं चांगलंच असतं. पण ज्यांना डायबिटिस किंवा शुगरचा (suffering from diabetes) त्रास असतो, अशी मंडळी यासाठी अपवाद ठरू शकतात. बऱ्याचदा सणवार असताना खाण्यापिण्याची पथ्यं पाळली जात नाहीत. त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. एकतर सगळ्यांसोबत आग्रहाने जेवलं जातं. आता गणपती- महालक्ष्मी म्हटल्यावर उकडीचे मोदक, मोदकाचे वेगवेगळे प्रकार, पुरणाचा स्वयंपाक असं सगळंच घरी तयार केलं जातं. त्यामुळे मोह होतो आणि गोड पदार्थ खाल्लेच जातात. आता हे गोड पदार्थ पोटात जाणार असतील, तर निदान शुगर वाढविणारी फळं (fruits having high glycemic index) खायचं टाळणं, एवढं तर आपण निश्चितच करू शकतो. त्यासाठीच जर गोडधोड खाणार असाल तर काही फळं खाणं टाळलंच पाहिजे. (How to control sugar in festive season)

 

फळं खाणं का ठरू शकतं धोक्याचं?Diabetes.co.uk यांनी केलेल्या अभ्यासानुसार काही फळं अशी असतात, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. म्हणजेच अशी फळं खाल्ल्यानंतर त्यातली साखर खूप लवकर रक्तात मिसळते. आणि त्यामुळे मग रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.  तसेच काही केसेसमध्ये इन्सुलिनचं प्रमाण देखील वाढलेलं लक्षात आलं असून यामुळे रक्तातील साखर मोठ्या प्रमाणावर  अनियंत्रित होऊन जाते तसेच दर २- ३ तासांनी भूक लागते. म्हणून मधुमेह असणाऱ्यांनी काही फळांचं सेवन कटाक्षाने टाळलंच पाहिजे. 

 

मधुमेह असणाऱ्यांनी ही फळं खाणं टाळावं१. केळी२. आंबा

उकडीचे मोदक करताना फाटतात? सारण बाहेर येऊन मोदक फुटू नये म्हणून ५ टिप्स आणि खास रेसिपी३. संत्री४. खजूर५. नाशपाती६. द्राक्ष७. लाल मनुका 

 

हे देखील लक्षात घ्या१. जांभुळ, आलुबुखार, किवी अशी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारी फळं मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात.२. कोल्ड्रिंक, पांढरा ब्रेड, पांढऱ्या तांदळाचा भात, बटाटे या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफळेहेल्थ टिप्समधुमेह