Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हायपोथायरॉइडिझम : खूप थकवा येणाऱ्या या आजारात ‘डाएट’ सांभाळा, बघा तुम्ही चुकून हे सगळं तर खात नाही?

हायपोथायरॉइडिझम : खूप थकवा येणाऱ्या या आजारात ‘डाएट’ सांभाळा, बघा तुम्ही चुकून हे सगळं तर खात नाही?

हायपोथायरॉइडिझम ही नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं अतिशय अवघड परिस्थिती असते. औषधोपचार हाच यावरचा मुख्य उपचार. पण त्याला आहाराची जोड देऊन हा आजार नियंत्रणात ठेवायला मदत होते तसेच या आजारावर जे औषधोपचार चाललेले असतात ते औषधोपचार शरीरात नीट शोषले जाण्यास आपण घेत असलेला आहार खूप महत्त्वाचा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 PM2021-05-25T16:38:01+5:302021-05-25T17:27:33+5:30

हायपोथायरॉइडिझम ही नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं अतिशय अवघड परिस्थिती असते. औषधोपचार हाच यावरचा मुख्य उपचार. पण त्याला आहाराची जोड देऊन हा आजार नियंत्रणात ठेवायला मदत होते तसेच या आजारावर जे औषधोपचार चाललेले असतात ते औषधोपचार शरीरात नीट शोषले जाण्यास आपण घेत असलेला आहार खूप महत्त्वाचा आहे.

Diet is important in hypothyroidism! You need to know what foods to avoid / reduce! | हायपोथायरॉइडिझम : खूप थकवा येणाऱ्या या आजारात ‘डाएट’ सांभाळा, बघा तुम्ही चुकून हे सगळं तर खात नाही?

हायपोथायरॉइडिझम : खूप थकवा येणाऱ्या या आजारात ‘डाएट’ सांभाळा, बघा तुम्ही चुकून हे सगळं तर खात नाही?

Highlightsक्रूसिफिरस हा घटक मात्र थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्या कमी प्रमाणात आणि व्यवस्थित शिजवूनच खाव्यात. मेदयुक्त आहारामुळे औषधोपचारंनी थायरॉइड संप्रेरकं शरीरात जातं त्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय पदार्थातील फॅटसचा परिणाम थायरॉइडसच्या निर्मितीवर होतो.चयापचय क्रिया सुधारण्यासाठी पुरेसं फायबर शरीरात जाणं आवश्यक असतं. पण अति फायबरमुळे हायपोथायरॉडिझमच्या उपचारात अडथळा निर्माण होतो.

थायरॉइड हे शारीरिक क्रिया व्यवस्थित आणि संतुलित ठेवणारं एक महत्त्वाचं हार्मोन. थायरॉइड निर्माण करणाऱ्या ग्रंथीचं काम व्यवस्थित चालणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण् अनेकदा यात शारीरिक आणि पर्यावरणीय घटकांचा परिणाम होऊन अडथळे येतात. आणि थायरॉइड ग्रंथीतून थायरॉइड पुरेसं निर्माण होत नाही. त्यामुळे हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. यालाच अंडरअ‍ॅक्टिव्ह थायरॉइड असंही म्हटलं हातं. हायपोथायरॉइडिझम ही नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं अतिशय अवघड परिस्थिती असते. औषधोपचार हाच यावरचा मुख्य उपचार. पण त्याला आहाराची जोड देऊन हा आजार नियंत्रणात ठेवायला मदत होते, तसेच या आजारावर जे औषधोपचार चाललेले असतात ते औषधोपचार शरीरात नीट शोषले जाण्यास आपण घेत असलेला आहार खूप महत्त्वाचा आहे.
हायपोथारॉडिझम या आजाराबाबतीत आधी आहाराच्यासंबंधी कोणती पथ्यं कटाक्षानं पाळायला हवीत हे समजून घ्यायला हवं. काही विशिष्ट पदार्थ किंवा घटक हे शरीरात कमी, नियंत्रित स्वरुपात जाणं आवश्यक असतं. न चालणारे पदार्थ कमी करुन अथवा वजा करुन आहाराद्वारे समतोल साधला तर औषधोपचारांच्या परिणामाला आणि थायरॉइड ग्रंथीतून थायरॉइड निर्माण व्हायला मदत होते.

हायपोथायरॉइडिझम- काही पदार्थांबाबत पथ्यं पाळणंच हिताचं!

सोया घटक असलेले पदार्थ.- सोया घटकाला आयसोफ्लेवोनस असं म्हटलं जातं. हा घटक हायपोथारॉडिझम रुग्णावर प्रतिकूल परिणाम करतो. सोया घटकामुळे औषधोपचारांद्वारे दिलं जाणारं थायरॉइड शरीरात शोषून  घेण्यास अडथळे येतात. त्यामुळे सोया हा घटक असलेले पदार्थ शक्यतो टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण जर खायचेच झाले तर मर्यादित प्रमाणात खावेत. सोया घटक असलेल्या पदार्थांचं सेवन आणि औषधं यात किमान चार तास तरी अंतर असायला हवं. सोया घटक किती प्रमाणात ग्रहण करायला हवा याबाबत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- क्रूसिफिरस हा घटक प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर आणि बोक्रोली या भाज्यांमधे असतो. या तिन्ही भाज्या यातील तंतुमय घटक आणि पोषणमुल्यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, मात्र यातला क्रूसिफिरस हा घटक मात्र थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे या भाज्या कमी खाव्यात. त्या जर खूप प्रमाणात खाल्ल्या तर त्यांचं पचन करताना थायरॉइडची आयोडिन वापरण्याची क्षमता बंद होते. जर हायपोथायरॉडिझम आणि आयोडिनची कमतरता हे दोन्ही त्रास एकदम असतील तर मग क्रूसिफिरस हा घटक असलेल्या भाज्या कमी खाव्यात, शिजवून खाव्यात.

- हायपोथायरॉइडिझम असलेल्यांनी आहारातील ग्लूटेनचं प्रमाण अत्यल्प करावं. ग्लूृटेन हे एक प्रकारचम प्रथिनं असतं जे गव्हावर प्रक्रिया करुन केलेल्या पदार्थांमधे आढळतं. ग्लूटेनचं प्रमाण किती असायला हवं याबाबत डॉक्टर मार्गदर्शन करतात, आणि जर ग्लूटेन आहारातून वगळायचं नसेल तर ब्रेड, पास्ता  हा होल ग्रेनचाच निवडावा. याचा परिणाम आतड्यांमधली अनियमितता दूर होण्यास मदत होते. ग्लूटेनयुक्त पदार्थ हे औषधं घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर बऱ्याच काळानं खायला हवीत.

- मेदयुक्त आहारामुळे औषधोपचारंनी थायरॉइड संप्रेरकं शरीरात जातं त्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय पदार्थातील फॅटसचा परिणाम थायरॉइडसच्या निर्मितीवर होतो. त्यामुळे चीज, बटर, , मेयोनिज हे घटक आहारातून एकतर वजा तरी करावेत नाहीत आहारातलं त्यांचम प्रमाण एकदम कमीतरी करणं आवश्यक आहे.

- हायपोथायरॉइडिझममुळे चयापचयाची क्रिया अतिशय मंदावलेली असते. त्यामुळे योग्य काळजी घेतली नाही तर वजन झपाट्यानं वाढतं. म्हणून अति साखरेचे पदार्थ खाऊ नये. कारण या पदार्थात केवळ उष्मांक असतात. पोषण मूल्यं नसतात.

- प्रोसेस्ड फूड हे देखील हायपोथायरॉइडिझममधे टाळायला हवेत. कारण या पदार्थात  सोडियमचं प्रमाण खूप असतं. हे पदार्थ जास्त खाल्ले तर हायपोथायरॉइडिझम असलेल्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होउ शकतो. प्रोसेस्ड फूड घेताना आधी पॅकेटवरील इंंन्ग्रेडिअण्टसचा तक्ता नीट वाचावा. सोडियमचं प्रमाण अत्यल्प असलेले पदार्थच योग्य असतात. उच्च रक्तदाबाचा त्रास टाळण्यासाठी १,५०० मिलिग्राम दिवसाला इतकंच सोडियम शरीरात जाणं आवश्यक असतं.

- चयापचय क्रिया सुधारण्यासाठी पूरेसं फायबर शरीरात जाणं आवश्यक असतं. पण अति फायबरमुळे हायपोथायरॉइडिझमच्या उपचारात अडथळा निर्माण होतो. धान्यं, कडधान्यं, भाज्या, फळं, यातून जर शरीराला पुरेसं फायबर मिळणं गरजेचं असतं. पण अतिप्रमाणात फायबर गेलं तर मात्र औषधोपचारातून दिलं जाणारं थायरॉइड हार्मोन्स शोषले जाण्यात अडथळा येतो.

- कॉफीमधील कॅफिन या घटकामुळे औषधोपचारातून दिलं जाणारं थायरॉइड शोषलं जाण्यात अडथळा येतो. अनेकजण थायरॉइडची सकाळची गोळी कॉफीसोबत घेतात. तज्ज्ञांच्या मतानुसार ही सवय एकदम चूक आहे. कॅफिनमुळे थायरॉइडची पातळी अनियंत्रित होते. त्यामुळे थायरॉइडची गोळी ही पाण्यासोबत घ्यावी. आणि त्यानंतर तासाभरानं कॉफी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

- अल्कोहोच्या सेवनानं शरीरातील थायरॉइडची पातळी आणि थायरॉइड निर्मितीची क्षमता यावर विपरित परिणाम होतो. यासंदर्भात झालेला अभ्यास सांगतो की अल्कोहोलचा विषारी परिणाम थायरॉइड ग्रंथीवर होतो. म्हणूनच तज्ज्ञ हायपोथायरॉइडिझमअसलेल्यांना अल्कोहोल न घेण्याचं पथ्यं पाळायला लावतात. 

Web Title: Diet is important in hypothyroidism! You need to know what foods to avoid / reduce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.