Join us  

Weight loss tips: आहार की व्यायाम? वजन कमी करण्यासाठी काय जास्त महत्त्वाचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2022 2:43 PM

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी डाएटवर (diet) फोकस करू की वर्कआऊट (workout) वाढवू, असा प्रश्न पडला असेल, तर याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, ते नक्की वाचा...

ठळक मुद्देआहाराकडे दुर्लक्ष करून केवळ व्यायाम करण्यावर फोकस करणार असाल, तर वजन कमी होणार नाही. कारण वजन घटविणे हा व्यायामाचा मुख्य उद्देश नाही.

वजन कमी करण्यासाठी बरेच जण खूप अधीर होऊन जातात.. काय हवं ते करूया पण अमूक एवढ्या वेळात वजन घटवूच या, अशा जिद्दीलाही अनेक जण पेटलेले असतात. डाएट आणि वर्कआऊट दोन्हींवरही मग खूपच काम केलं जातं.. पण याचा नेमका उलटाच परिणाम दिसून येतो. योग्य आहार (diet) मिळत नाही आणि त्यात वर्कआऊटचं (weight loss tips) प्रमाणही वाढलेलं असतं. त्यामुळे मग खूप जास्त विकनेस येतो आणि सगळाच वेटलॉस प्लॅन बारगळून जातो. 

 

तुमचंही असंच झालं असेल किंवा वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, कशी सुरुवात करावी, डाएट आणि व्यायाम यांचं कॉम्बिनेशन कसं ठेवावं, हे समजत नसेल तर यावर फिटनेस एक्सपर्ट (expert's opinion on weight loss) काय सल्ला देतात ते जरूर वाचा. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी खा, दुसऱ्या दिवशी जीममध्ये डबल मेहनत घ्या.. जास्तीतजास्त वर्कआऊट करून कॅलरी बर्न करा, वजन कमी होईल.. असंही सध्या खूप सांगितलं जातं.. पण ते ही खरं आहे का, त्याचाही खरोखर फायदा होऊ शकतो का?

 

त्यासाठीच हे जाणून घ्या...१. आपल्याला जी काही उर्जा मिळते ती आपल्या आहरातून. आहारातून मिळणाऱ्या एकूण कॅलरीजच्या केवळ १० ते ३० टक्के भाग आपण व्यायामाने बर्न करू शकतो. त्यामुळे वाटेल तो आहार घेणार असाल आणि मग कॅलरीज बर्न करण्यासाठी दुप्पट वर्कआऊट करणार असाल, तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. २. अमूक एवढा आहार आणि एवढं वर्कआऊट हा एकासाठी लावलेला नियम दुसऱ्याला जशास तसा लागू होत नाही. वजन कमी करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी आहार, अनुवंशिकता, शरीराची ठेवण, शारिरीक हालचाली अशा सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही प्लॅन फॉलो करू नका.

 

३. आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ व्यायाम करण्यावर फोकस करणार असाल, तर वजन कमी होणार नाही. कारण वजन घटविणे हा व्यायामाचा मुख्य उद्देश नाही. व्यायाम करण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक आहे वजन कमी करणे. त्यामुळे फिट राहण्यासाठी, शरीराची लवचिकता कायम ठेवून फिटनेस वाढविण्यासाठी व्यायाम करा. पण वजन कमी करणे हा एकच उद्देश व्यायामाचा असू शकत नाही.४. वजन कमी करण्यासाठी आहारात काही महत्त्वपूर्ण बदल करा. रिफाईंड कार्ब्स, मीठ यांचं सेवन कमी करा. कच्च्या भाज्या, फळं यांचं प्रमाण वाढवा. आपण काय आणि किती खातो आहोत, याकडे काटेकोर लक्ष द्या आणि नंतर त्याला व्यायामाची जोड देऊन फिट रहा. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना