Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा

ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा

Diet Plan For Working Women कामाची इतकी धावपळ की स्वत:साठी वेळ काढणं जमत नाही, अशावेळी काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 05:52 PM2023-05-23T17:52:38+5:302023-05-23T17:53:12+5:30

Diet Plan For Working Women कामाची इतकी धावपळ की स्वत:साठी वेळ काढणं जमत नाही, अशावेळी काय करावं?

Diet Plan For Working Women | ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा

ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा

घरातील महिला प्रत्येकाच्या आरोग्याची व आहाराची काळजी घेते. ऑफिसचं काम असो किंवा घरचं ती प्रत्येक काम योग्यरित्या हाताळते. पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळत नाही. एकंदरीत ती दुसऱ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी जगायला विसरते. योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे महिलांना अशक्तपणा, थकवा व इतर अनेक समस्या छळतात.

दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश असावा. ज्या महिला ऑफिसचं काम करून घर सांभाळतात, त्यांना डाएट फॉलो करायला जमत नाही. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. आपण एक दिवसाचं डाएट फॉलो करूनही शरीर सुदृढ व निरोगी ठेऊ शकता. या डाएटविषयी माहिती डायटीशियन मनोली मेहता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे(Diet Plan For Working Women).

दिवसाची सुरुवात

सकाळी उठल्यानंतर आवळा व आलं मिक्स करून पेय तयार करा, व प्या. त्यासोबत ५ ते ७ भिजवलेले बदाम खा. शरीराला डिटॉक्स करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पेय खूप फायदेशीर ठरेल. हे पेय पचनासाठी देखील उत्तम आहे.

ब्रेकफास्ट

नाश्त्यासाठी अनेक पर्याय आहेत. आपण चिया सीड्स आणि फळांसह ओट्स खाऊ शकता, किंवा बेसन चिला, दलिया, उपमा खाऊ शकता. या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट भरलेले वाटते.

मिड मॉर्निंग

यावेळेला फळांचे ज्यूस प्या. फळांमध्ये भरपूर फायबर असते. कोणत्याही हंगामी फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

ताक आणि राजगिरा खाऊन सुटलेलं पोट कमी होईल? खा ५ गोष्टी, सोपा आहार - पाहा बदल

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणात आपण कोशिंबीरसोबत लेमन राइस, भाजी व नाचणी किंवा डाळ खिचडी खाऊ शकता. दुपारच्या जेवणासाठी हे सर्व पर्याय आरोग्यासाठी उत्तम ठरेल. या पदार्थांमध्ये भरपूर पोषणही असते. आपण आपल्या आवडीनुसार यात वेगळे पदार्थ अॅड करू शकता.

सायंकाळचा नाश्ता

संध्याकाळच्या स्नॅकमध्ये आपण सोया किंवा आलमंड मिल्क कॉफीसह खाखरा किंवा मखना खाऊ शकता. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण हे हेल्दी पदार्थ खाऊ शकता.

व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा

डिनर

रात्रीच्या जेवणात आपण मुगाच्या डाळीसोबत व्हेज खिचडी किंवा डाळ-भात, कटलेट खाऊ शकता. रात्रीच्या जेवणानंतर पचनासाठी बडीशेपचे पाणी किंवा हेल्दी ड्रिंक पिऊ शकता. हा डाएट आप्म्न दररोज देखील फॉलो करू शकता. 

Web Title: Diet Plan For Working Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.