Join us  

कोण म्हणतं भात खाल्ला की पोट सुटतं? भात खाऊनही राहा फिट-तज्ज्ञ देतात १ सल्ला ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 6:07 PM

Diet Tips by Pooja Banga Misconception about Rice Makes you Fat : आवडणारी गोष्ट खायला मिळत नसल्याने आपले पोट किंवा मन जेवलो तरी मनासारखे भरतेच असे नाही.

ठळक मुद्देआपण एखादा पदार्थ खातो त्यासोबत आपण कोणता पदार्थ खातो किंवा त्याचे कसे कॉम्बिनेशन करतो हे पाहणेही महत्त्वाचे असते.आहारतज्ज्ञ सांगतात, भात खा, पण कसा ते समजून घ्या..वाढणार नाही वजन

भात हा आपल्यापैकी अनेकांसाठी विक पॉईंट असतो. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. गरमागरम भात असला की आपल्याला ताटात बाकी काही नसले तरी चालते. मग नेहमी वरण-भात किंवा आमटी भात खाण्यापेक्षा आपण कधी मूगाच्या डाळीची खिचडी, कधी पुलाव, दही भात, अंडा बिर्याणी आणि भाताचे असे बरेच प्रकार ट्राय करतो. मात्र अनेकदा भात खाल्ल्याने वजन वाढते. भात खाल्ल्याने शुगर वाढते असे म्हणत अनेकांना आपल्या मनाला मुरड घालत भात खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. अनेकदा आवडणारी गोष्ट खायला मिळत नसल्याने आपले पोट किंवा मन जेवलो तरी मनासारखे भरतेच असे नाही (Diet Tips by Pooja Banga Misconception about Rice Makes you Fat). 

(Image : Google)

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पूजा बांगा भात खाण्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात. त्या म्हणतात भात खाल्ल्याने वजन वाढते हा गैरसमज आहे. त्याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिड़िओ शेअर केला असून त्यामध्ये भात आणि वजन वाढणे याबाबतच्या गैरसमजाविषयी त्या महत्त्वाची माहिती देतात. भाताबाबत आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नाविषयी त्या एक महत्त्वपूर्ण सल्ला देतात. भात खाऊनही आपलं वजन किंवा फॅटस वाढत नाहीत हे सांगताना त्या नेमकं काय सांगतात ते पाहूया. 

तर भात खाऊनही वाढणार नाही तुमचं वजन...

भाताचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो म्हणजेच भात खाल्ल्यावर तो पटकन रक्तातील साखरेत मिसळतो. हे जरी खरे असले तरी आपण फक्त भात खात नाही. आपण भातासोबत भाजी किंवा डाळ खातो. त्यामुळे हे दोन घटक जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी होतो. तसेच यासोबत तुम्ही सलाड खाल्ले तर त्यामध्ये फायबर असल्याने भात पचायला मदत होते आणि साखर रक्तात मिसळण्याच्या कार्याचा वेग कमी होतो. त्यामुळे आपण एखादा पदार्थ खातो त्यासोबत आपण कोणता पदार्थ खातो किंवा त्याचे कसे कॉम्बिनेशन करतो हे पाहणेही महत्त्वाचे असते. पूजा बांगा यांनी शेअर कलेली पोस्ट इन्स्टाग्रावर अनेकांनी लाईक केली असून बऱ्याच जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाहेल्थ टिप्स