Join us  

डाएटिंग करणं कठीण जातंय? बघा अभिनेत्री अवंतिका हुंडालने सांगितलेला भन्नाट फंडा, दिल तो पागल है..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 5:09 PM

Dieting Tips: डाएटिंग करताना आवडीचे पदार्थ खावे वाटले तर अभिनेत्री अवंतिका हुंडालचा (actress Avantika Hundaal) हा भन्नाट फंडा वापरून बघा.. डाएटिंग करणं सोपं जाईल... हा मजेदार व्हिडिओ (viral video) एकदा बघाच..

ठळक मुद्देतुम्ही वेटलॉस प्रोसेसमध्ये असाल आणि त्यासाठी डाएटिंग करत असाल, तर आवडीचे पदार्थ खावे वाटले, तर काय करायला पाहिजे हे सांगतेय अभिनेत्री अवंतिका हुंडाल.

डाएटिंग करणं हे खरंच सोपं काम नाही. कारण कितीही नाही म्हटलं तरी डाएटिंगचे (diet tips) पदार्थ आपल्या नेहमीच्या आवडीच्या पदार्थांपेक्षा चवीने जरा उन्नीस- बीस असतातच. डाएटमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांना कितीही चवदार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची चव आपल्या आवडीच्या पिझ्झा, नुडल्स, मसालेदार चमचमीत भाज्यांसारखी थोडीच होणार आहे.. त्यामुळे कधी ना कधी डाएटिंगचे सपक पदार्थ खाण्याचा कंटाळा येतोच आणि आपले आवडीचे स्वादिष्ट पदार्थ खाण्याचा मोह (food cravings) होतो. (How to stop food cravings while on dieting?)

 

आवडीचे पदार्थ खाण्याचा मोह एका क्षणापुरता असतो. पण त्याच्यापायी मात्र आपल्या कित्येक दिवसांच्या मेहनतीवर पाणी पडतं. म्हणूनच डाएटिंग करताना आवडीच्या पदार्थांचा मोह टाळायला हवा.. हे आपल्याला कळत असलं तरी अनेकदा वळत नाही. म्हणूनच तर हा एक मस्त व्हिडिओ एकदा बघाच. जर तुम्ही वेटलॉस प्रोसेसमध्ये (weight loss process) असाल आणि त्यासाठी डाएटिंग करत असाल, तर आवडीचे पदार्थ खावे वाटले, तर काय करायला पाहिजे हे सांगतेय अभिनेत्री अवंतिका हुंडाल. तिचा हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला असून तो भन्नाट व्हायरल झाला आहे. 

 

यामध्ये अवंतिकाच्या एका हातात आहे ब्रोकोली आणि दुसऱ्या हातात आहे तिचं आवडीचं चॉकलेट. तिला चॉकलेट खाण्याचा खूप मोह होतो आहे. पण तिला मात्र डाएटिंगसाठी ब्रोकोली खाणं गरजेचं आहे. म्हणूनच तर तिने त्यावर एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. खाण्याच्या आधी ती तिच्या आवडत्या चॉकलेटचा सुवास घेते आहे आणि खाताना मात्र ब्रोकोली खात आहे. हा प्रयोग एकदा करून बघायला हरकत नाही. दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखा हा प्रकार असला तरी आवडीच्या पदार्थाचा सुगंध घेत घेत नावडता पदार्थ चटकन संपत असावा, असं वाटतं.. कधी तरी करून बघा हा असाही प्रयोग.. फक्त तेव्हा मात्र एकच काळजी घ्यायला हवी की आवडत्या पदार्थाचा सुगंध घेऊन तो चाखून बघण्याची भावना आणखीनच वाढायला नको..  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाइन्स्टाग्राम