Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नवीन वर्षात फिट राहायचं तर फक्त ६ गोष्टी करा, डॉ. श्रीराम नेनेंचा खास सल्ला

नवीन वर्षात फिट राहायचं तर फक्त ६ गोष्टी करा, डॉ. श्रीराम नेनेंचा खास सल्ला

6 things to stay fit in the new year Dr. Nene's special advice : बॉलिवूड अभिनेत्री  माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr, Shriram Nene) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर हेल्थ आणि डाएटसंबंधित काही टिप्स शेअर केल्या आहेत.  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 19:18 IST2025-01-02T17:53:06+5:302025-01-02T19:18:50+5:30

6 things to stay fit in the new year Dr. Nene's special advice : बॉलिवूड अभिनेत्री  माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr, Shriram Nene) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर हेल्थ आणि डाएटसंबंधित काही टिप्स शेअर केल्या आहेत.  

Do 6 things to stay fit in the new year Dr. Nene's special advice | नवीन वर्षात फिट राहायचं तर फक्त ६ गोष्टी करा, डॉ. श्रीराम नेनेंचा खास सल्ला

नवीन वर्षात फिट राहायचं तर फक्त ६ गोष्टी करा, डॉ. श्रीराम नेनेंचा खास सल्ला

आजकालच्या लाईफमध्ये फिटनेसचं खूप महत्व आहे. आयुष्यात अनेक समस्या येत असतात, अशावेळी लोक  फिट राहणं पसंत करतात.  यासाठी तुम्ही  काही खास उपायही करू  शकता. लोकांनी कमी वयातच आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. ज्यात हेल्दी डाएट आणि व्यायाम यांचा समावेश आहे. (6 things to stay fit in the new year Dr. Nene's special advice)

बॉलिवूड अभिनेत्री  माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr, Shriram Nene) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर हेल्थ आणि डाएटसंबंधित काही टिप्स शेअर केल्या आहेत.  ज्यामुळे दीर्घकाळ जीवन चांगले  राहण्यास मदत होईल. डॉ.  नेने यांनी दीर्घायुष्य आणि निरोगी राहण्यासाठी काही लाईफ सिक्रेट्स सांगितले आहेत.

निरोगी राहण्यासाठी ६ गोष्टी करा

हेल्दी आणि बॅलेंन्स डाएट फिटनेस आणि दीर्घायुष्यासाठी फार महत्वाचा आहे. ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ फिट राहण्यस मदत होईल. आपल्या आहारात वयानुसार कार्ब्स, प्रोटीन्स, मिनरल्सचा समावेश करा. यासाठी तुम्ही आहारातज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

दात किडले, हिरड्या काळपट पडल्या? ४ उपाय, दातांची दुखणी आणि खर्च वाढणार नाही

व्यायाम

फिटनेस आणि दीर्घायुष्यासाठी हेल्दी आणि बॅलेन्स डाएटसोबतच रेग्युलर व्यायाम करणंही गरजेचं आहे. ज्यामुळे शरीर एक्टिव्ह राहते. हा व्यायाम केल्यानं इम्यून सिस्टिम चांगली राहते आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

वाढत्या वयात स्मोकींग आणि अल्कोहोलच्या सवयीपासून लांब राहा. स्मोकिंग आणि अल्कोलच्या सवयीनं हार्ट हेल्थवर चुकीचा परिणाम होतो. याशिवाय स्किन हेल्दी राहते. स्मोकिंगमुळे त्वचेवर रिंकल्स येऊ लागतात. लिव्हर खराब होण्याचा धोका असतो. याचा सरळ परिणाम इम्यून सिस्टिमवर होतो.

मुलांनी आपल्याशी कायम आदरानं बोलावं असं वाटतं? आईबाबांनी आधी स्वत: बदलायला हव्या ६ सवयी

ताण घेऊ नका

वाढत्या वयात फिटनेससाठी फिजिकल हेल्थबरोबरच मेंटल हेल्थही चांगली राहणं गरजेचं आहे. आजच्या जीवनात मेंटल त्रास वाढतात. स्ट्रेस एंग्जायटीमुळे फिट राहणं अवघड होतं. अशा स्थितीत ताण-तणावापासून बचावासाठी ध्यान किंवा योगाची मदत घ्या. 

कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा

वाढत्या वयात ताण-तणावापासून बचावासाठी आपले कुटूंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा. यामुळे तुम्ही वेगवेगळ्या समस्या विसरू लागाल आणि हसत खेळत वेळ जाईल.

स्किन केअर

वाढत्या वयात  तुम्हाला स्किन केअरचीही बरीच आवश्यकता असते. अशा स्थितीत रेग्युलर स्किन केअर करायला हवी. स्मोकिंग, अल्कोहोलपासून दूर राहाल. सनस्क्रीनचा वापर करा. झोपण्याआधी नाईट क्रिमचा वापर करा. ज्यामुळे त्वचेवर रिंकल्स आणि फाईन लाईन्स येणार नाहीत. वाढत्या वयात लोकांनी फिटनेसवर जास्त लक्ष द्यायला हवं. डॉ. नेने यांनी सांगितलेले उपाय  करून तुम्ही आयुष्यभर फिट राहू शकता. 
 

Web Title: Do 6 things to stay fit in the new year Dr. Nene's special advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.