निरोगी आयुष्य जगण्यासाठी वजन कमी करणं आवश्यक आहे (Weight Loss). वेट लॉस केल्याने गंभीर आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वजन हे वाढतच चाललं आहे (Fitness). कमी करताना नाकीनऊ येत आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायामासह डाएटही फॉलो करीत आहेत. क्रॅश डाएट, अधूनमधून उपवास आणि डाएटिंगसारखे पर्याय निवडत आहेत.
जर या सगळ्या गोष्टी करूनही वेट लॉस होत नसेल तर, आहारतज्ज्ञ गीतांजली सिंग यांनी सांगितलेला मध आणि जिऱ्याचा सोपा उपाय करून पाहा. यासह निरोगी आहाराचे पालन करणे, जंक फूड टाळणे आणि जिरे - मधाचे पेय पीत राहा. काही महिन्यात वजनात होणारी घट दिसून येईल'(Do cumin seeds with honey help in weight loss?).
वजन कमी करण्यासाठी मध - जिऱ्याचा सोपा उपाय
चयापचय बुस्ट होते
चयापचय बुस्ट करण्यासाठी आपण जिरे आणि मध खाऊ शकता. जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचे एक संयुग असते, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे चयापचय बुस्ट होते. शिवाय वारंवार भूकही लागत नाही.
दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक
पचन सुधारते
जिरे आणि मधाचे पेय प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जिरे आणि मध पाचक एन्ज़ाइम्सला प्रोत्साहन देते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असते. ज्यामुळे आपण मध खाऊ शकता. तर जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचे तत्व असते, जे शरीरात इन्शुलीन तयार करण्यास मदत करते. मधासोबत जिरे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते.
भूक कमी लागते
मध - जिऱ्याचे पेय आणि निरोगी जीवनशैली फॉलो केल्याने वेट लॉससाठी मदत होते. दोन्हीतील ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ज्यामुळे भूक कमी प्रमाणात लागते. शिवाय शरीर अॅक्टिव्ह राहते.
अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..
वजन कमी करण्यासाठी जिरे आणि मधाचे पेय कसे तयार करावे?
वेट लॉस पेय तयार करण्यासाठी ग्लासभर पाण्यात जिरे घालून भिजत ठेवा. रात्रभर तसेच ठेवा. सकाळी जिरे गाळून पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात चमचाभर मध घालून मिक्स करा, आणि झोपण्यापूर्वी प्या. यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल.