Join us  

आंबा किंवा आंब्याचा रस यासोबत चुकूनही खाऊ नका 3 पदार्थ,  त्वचा आणि आरोग्यासाठी ठरेल घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 3:09 PM

Summer Special: अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याचा धडाका सुरू होणार.. म्हणूनच यथेच्छ आमरस (mango juice) खाण्यापुर्वी या काही गोष्टींचीही काळजी घ्या..

ठळक मुद्देचुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचेही नुकसान होऊ शकते.

सध्या बाजारात आंबा आला आहे. पण अजूनही योग्य प्रमाणात आंबा न आल्याने आंब्याचे भाव चढेच आहेत. त्यामुळे अगदी पोटभर यथेच्छ आमरस खाणे आणि आंब्यांचा आस्वाद (eating mango) घेणे बऱ्याच घरांमध्ये झालेले नाही. पण आता अवघ्या काही दिवसांवर अक्षय तृतीया आहे. तिथून मग खऱ्या अर्थाने आमरसाचा हंगाम सुरू होतो.. यथेच्छ, भरपूर आमरस खा. पण त्यासोबतच आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. कारण चुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचेही नुकसान होऊ शकते. (food that should not eat with mango)

 

आंब्यासोबत कधीही खाऊ नयेत असे पदार्थ१. दही (curd)मँगो लस्सीची सध्या खूप क्रेझ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाऊनही हा पदार्थ खाल्ला जातो आणि अनेक घरांमध्येही मँगो लस्सी आवर्जून केली जाते. पण कोणत्याही फळासोबत दही खाणे योग्य नाही. कारण ते दोन्हीही आयुर्वेदानुसार विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. लस्सी करताना त्यात दही टाकलेच जाते. त्यामुळे मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही. 

 

२. पाणी (water)जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीत रस टाकला जातो आणि मग एकेक चमचा करत रस संपवून जेवण आटोपतं घेतलं जातं. जेवणाच्या शेवटी आमरसाचा असा मस्त आस्वाद घेतल्यानंतर त्यावर पाणी पिणे टाळा. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण १५ मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खा आणि मग पाणी प्या. 

 

३. मसालेदार पदार्थ (spicy food)जेव्हा जेवणात आमरस असेल तेव्हा साधारण खूप मसाले आणि तेल घालून भाज्या करणं टाळावं. आमरस असताना एखाद साधी भाजी करणं उत्तम. कारण आधीच आंबा पचायला जड असतो. अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते. तसंच काहीसं मसालेदार, तेलकट पदार्थांमुळेही होतं. असे पदार्थ अनेकांना सहन होत नाहीत. म्हणूनच जर आमरस आणि मसालेदार पदार्थ एकत्र आले तर ॲसिडिटी खूपच जास्त वाढू शकते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळा. 

 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स