Join us

रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे करा 'या' ५ सोप्या गोष्टी, वजन कमी करण्यास मिळेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:14 IST

Weight loss tips : काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. रात्री जेवणानंतर जर या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला वजन कंट्रोल करता येऊ शकतं. 

Weight loss tips : वाढलेल्या वजनाची चिंता आजकाल भरपूर लोकांना सतावत असते. वजन वाढलं की, शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांनाच यातून फायदा मिळतो असं नाही. डाएट, एक्सरसाईज, योगा करूनही काही लोकांचं वजन कमी होत नाही. पण काही अशा कॉमन गोष्टी असतात, ज्या फॉलो केल्या तर वजन कंट्रोल करण्यास मदत मिळू शकते. अशाच काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. रात्री जेवणानंतर जर या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला वजन कंट्रोल करता येऊ शकतं. 

वजन कमी करण्यासाठी रात्री जेवणानंतर काय करावं?

- रात्री जेवणानंतर न विसरता १० ते १५ मिनिटं वॉक केलाच पाहिजे. वॉक केल्यानं पचनक्रिया व्यवस्थित होते. तसेच जेवणानंतर अर्ध्या तासानं १ ते २ ग्लास पाणी प्यावं. या गोष्टी नियमितपणे फॉलो केल्या तर शरीरातील विषारी तत्व लघवीच्या माध्यमातून बाहेर निघून जातात. यानं तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होईल, ज्यामुळे तुम्हाला हळूहळू का होईन वजन कमी करण्यास मदत मिळेल. तसेच बॉडी परफेक्ट शेपही मिळेल.

- रात्रीच्या जेवणानंतर मोठा श्वास घ्या. यानं तुम्हाला तुमचा तणाव कमी करण्यास मदत मिळेल आणि शांत वाटेल. ही अॅक्टिविटीही तुमचं वजन कमी करण्यास मदत करते.

- त्याशिवाय रात्री जेवणानंतर फोन किंवा कॉम्प्युटरचा खूप जास्त वापरही करून नका. यामुळे डोळे आणि त्वचेचं नुकसान होतं. जास्त वेळ एकाच बसल्यानं आणि स्क्रीन बघितल्यानं शरीरात फॅट जमा होतं. ज्यामुळे वजन वाढतं.

- तसेच रात्री जेवणानंतर हलकं स्ट्रेचिंग केल्यास शरीराला आराम मिळेल, सोबतच मांसपेशींना आराम मिळेल. यानंही वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच रात्री चांगली झोपही लागते. चांगली झोप ही वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाची ठरते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स