बेली फॅट, ब्रा फॅट, अंडरआर्म्स फॅट, थाइज फॅट, बॅक फॅट अशा या ना त्या प्रकारे महिलांच्या शरीरातील फॅट्सची विभागणी केली जाते. एकंदर शरीराच्या कोणत्याही भागाकडे पाहिले की आपण जाडजूड आहोत हे महिलांच्या लक्षात येते. असे आपले दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन कमी करण्यासाठी महिलांना न जाणो काय काय करावे लागते. वाढत्या वजनाचा आकडा कमी करण्यासाठी महिला जिम, डाएट यांसारख्या अनेक उपायांच्या मागे लागतात. असे असले तरीही कितीही काटेकोरपणे डाएट, एक्सरसाइज फॉलो केले तरीही (Weight loss may be harder for women than men! Here’s why) पुरुषच्या तुलनेत महिलांना वजन कमी करण्यासाठी अधिक वेळ लागतो. मिस इंडिया स्पर्धकांना प्रशिक्षण देणाऱ्या एक्सपर्ट डायटीशियन अंजली मुखर्जी (Anjali Mukerjee) यांनी यासंबंधीची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
अनेक महिलांचे वजन पटापटा वाढते मात्र वेट लॉस करताना खूपच त्रास होतो. जिममध्ये जाणाऱ्या पुरूष आणि महिलांंमध्ये तुलना केली तर अनेकांना वाटतं की पुरूषांचं वजन हे लवकर कमी होतं मात्र महिलांचं वजन कमी होण्याचा वेग कमी असतो आणि असं का ? Cleveland Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार, पुरूषांच्या तुलनेत महिलांनी वजन कमी करणे कठीण जाते हे खरं आहे, मात्र महिला वजन कमी करू शकत नाहीत असं अजिबात नाही. योग्य दृष्टीकोन, धैर्य आणि निश्चित स्वरूपात वेट लॉसबाबत विचार केल्यास, महिला असो वा पुरूष दोघांचेही वजन कमी होऊ शकते(Do women find it more difficult to lose weight as compared to men ?).
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन कमी करण्यासाठी जास्त वेळ का लागतो ?
१. स्त्री - पुरुषांच्या शरीरातील फॅट्सचे प्रमाण :- एक्सपर्ट डायटीशियन अंजलीच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या शरीरात फॅट लवकर जमा होते आणि ते पुरुषांच्या तुलनेत खूप हळूहळू कमी होते. स्त्रियांच्या शरीरात तारुण्यपासूनच फॅट्स जमा होणाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. पुरुष त्यांच्या तारुण्यात बारीक असतात पण मुलींचे शरीर लठ्ठ होऊ लागते. स्त्री किंवा पुरुष जेव्हा वय वाढत जाऊन वयस्कर होतात तोपर्यंत त्यांच्या शरीरात ३५ ते ४० % फॅट्सचे प्रमाण हे असतेच, परंतु स्त्रियांच्या बाबतीत ते थोडे जास्तच असते.
वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...
२. पचन क्रियेचा वेग कमी असतो :- स्त्रियांच्या चयापचय क्रियेचा वेग नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा कमी असतो. याचा अर्थ असा की महिलांचे शरीर श्वासोच्छवास, विचार आणि रक्ताभिसरण यासारख्या सामान्य शारीरिक कार्यांसाठी कमी कॅलरीज वापरते आणि उर्वरित कॅलरीज चरबीच्या रूपात शरीरात जमा होतात.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
३. शरीरात चरबी स्टोअर करून ठेवण्याची जागा वेगवेगळी असते :- जर आपण स्त्री आणि पुरुषांचा लठ्ठपणा बघितला तर स्त्रियांच्या बाबतीत बहुतेक चरबी ही नितंब, मांड्या, पाठ, कंबर आणि मानेवर स्टोअर केली जाते. परंतु पुरुषांमध्ये शरीरातील बहुतेक चरबी पोटाभोवती साठलेली असते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या नितंब आणि मांडीच्या भागाची चरबी कमी करणे अधिक कठीण असते, आणि म्हणूनच त्यांना लठ्ठपणा कमी करण्यात अधिक त्रास जाणवतो. पुरुषांची एक समस्या आहे की जेव्हा त्यांच्या पोटाची चरबी वाढते, तेव्हा त्यांना हृदयविकार किंवा मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...
४. स्नायूंवरील चरबी :- जर आपण फिजिकल फॅक्टरची तुलना केली तर पुरुषां मध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर अधिक प्रमाणात असल्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषां मध्ये मसल मांस म्हणजेच स्नायूंवरील चरबी अधिक प्रमाणात असते. स्नायू फॅटच्या तुलनेच कॅलरीज अधिक प्रमाणात बर्न करतं आणि संतुलित वजनासाठी अधिक कॅलरीजची गरज असते. म्हणूनच पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत अधिक कॅलरीजची गरज असते. हेच कारण आहे की महिलांना मसल मांस वाढवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगची आवश्यकता असते.
५. शरीर रचना :- पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी चरबी असते तर स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त चरबी असते. पुरुषांना ट्रंक आणि पोटाच्या आसपास ऍडिपोज टिश्यू जमा होण्याची अधिक शक्यता असते, तर महिलांचे ऍडिपोज टिश्यू सामान्यतः नितंब आणि मांड्यांभोवती आढळतात.