Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 12:15 PM2024-06-04T12:15:23+5:302024-06-04T12:16:44+5:30

Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain)

Do you avoid eating potato because it will increase your weight? Check out the tips to keep weight under control despite eating potatoes | वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

Highlightsबटाटा खाणं टाळण्यापेक्षा तो खाण्याची योग्य पद्धत पाहून घ्या. त्यामुळे वजन आणि शुगर दोन्हीही वाढण्याची भीतीच राहणार नाही.

बटाटा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. बटाट्याची भाजी हा बहुसंख्य लहान मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ असतो. बटाट्याची भाजी असली की मुलं अगदी व्यवस्थित जेवतात. लहानपणापासूनच असं बटाट्याचं प्रेम आपल्याला असतं. पण जसं आपण मोठे होतो तसं तसं बटाटा खाण्याची भीती वाटू लागते. बटाटा खाऊन वजन, शुगर वाढेल असं वाटतं. त्यामुळे मग कितीही आवडत असला तरी आपण बटाटा खाणं टाळतो. म्हणूनच आता बटाटा खाणं टाळण्यापेक्षा तो खाण्याची योग्य पद्धत पाहून घ्या (proper method of eating potato). त्यामुळे वजन आणि शुगर दोन्हीही वाढण्याची भीतीच राहणार नाही. (how to eat potato to avoid weight gain and increase in sugar)

 

वजन- शुगर वाढू नये म्हणून बटाटा कशा पद्धतीने खावा?

वजन आणि शुगर वाढू नये म्हणून बटाटा कशा पद्धतीने खायला पाहिजे याविषयीची आहारतज्ज्ञ गुरुप्रसाद दास यांनी दिलेली माहिती एचटी डिजीटल यांनी प्रकाशित केली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की बटाटा उकडून खाणं ही अतिशय योग्य पद्धत आहे.

मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

कारण त्यामुळे त्याच्यातल्या कॅलरी बऱ्याच प्रमाणात कमी होतात. शिवाय उकडण्यासाठी तेल लागत नाही. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी इनटेकही टाळला जातो. बटाटा उकडताना तो त्याच्या सालांसकट उकडावा. कारण यामुळे सालांमध्ये असणारे पोटॅशियम, फायबर असे पोषक गुणही बटाट्यात उतरतात आणि त्याचा पौष्टिकपणा आणखी वाढतो. 

 

उकडलेला बटाटा तुम्ही सलाडच्या माध्यमातून खाऊ शकता. उकडलेल्या बटाट्यावर चाट मसाला टाकून खाणेही अतिशय चवदार लागते. शिवाय उकडलेला बटाटा दही किंवा योगर्टमध्ये टाकूनही खाऊ शकता.

सतत अपचनाचा त्रास? आहारतज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने लवंग खा- पचन चांगलं होऊन मिळतील ५ फायदे

हा ब्रेकफास्टसाठी एक पौष्टिक आणि पोटभरीचा मेन्यू होऊ शकतो. उकडलेला बटाटा मॅश करा. त्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी असं सगळं कच्चं बारीक चिरून टाका. त्यावर ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स , चाटमसाला असं सगळं टाका आणि पोळीवर किंवा ब्रेडवर हे मिश्रण लावून खा. हा पदार्थही नाश्त्याला अतिशय उत्तम आहे. 
 

Web Title: Do you avoid eating potato because it will increase your weight? Check out the tips to keep weight under control despite eating potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.