Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ३० दिवसांचं वॉटर चॅलेंज! वजन घटवण्याच्या नव्या ट्रेण्डमागे पब्लिक पागल, पण तज्ज्ञ सांगतात..

३० दिवसांचं वॉटर चॅलेंज! वजन घटवण्याच्या नव्या ट्रेण्डमागे पब्लिक पागल, पण तज्ज्ञ सांगतात..

Health Tips: पाणी पिण्याचा हा नवाच ट्रेण्ड सोशल मिडियावर सध्या भन्नाट व्हायरल झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा काय नवा प्रकार आणि हे कसलं चॅलेंज (30 days water challenge) आहे ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 05:20 PM2022-08-19T17:20:34+5:302022-08-19T17:20:58+5:30

Health Tips: पाणी पिण्याचा हा नवाच ट्रेण्ड सोशल मिडियावर सध्या भन्नाट व्हायरल झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा काय नवा प्रकार आणि हे कसलं चॅलेंज (30 days water challenge) आहे ते?

Do you know 30 days water challenge? What is this new trend for weight loss? Expert's opinion about this health challenge | ३० दिवसांचं वॉटर चॅलेंज! वजन घटवण्याच्या नव्या ट्रेण्डमागे पब्लिक पागल, पण तज्ज्ञ सांगतात..

३० दिवसांचं वॉटर चॅलेंज! वजन घटवण्याच्या नव्या ट्रेण्डमागे पब्लिक पागल, पण तज्ज्ञ सांगतात..

Highlightsफिटनेससाठी हे ३० दिवसांचं वॉटर चॅलेंज देण्यात येत आहे आणि अनेक लोक ते तज्ज्ञांचा सल्ला न घेता इमाने- इतबारे करत आहेत.

सोशल मिडियावर कधी कोणता ट्रेण्ड व्हायरल (viral trend on social media) होईल आणि कोणता विषय उचलून धरला जाईल, हे काही सांगता येत नाही. सध्या या पाण्याच्या विषयाचंही असंच झालं आहे. फिटनेससाठी हे ३० दिवसांचं वॉटर चॅलेंज (30 days water challenge) देण्यात येत आहे आणि अनेक लोक ते तज्ज्ञांचा सल्ला न घेता इमाने- इतबारे करत आहेत. नेमकं काय आहे हे ३० दिवसांचं वॉटर चॅलेंज (new trend for weight loss) आणि त्यात करायचं तरी काय, याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत, याची ही सविस्तर माहिती.(Expert's opinion about 30 days water challenge)

 

३० दिवसांचं वॉटर चॅलेंज म्हणजे काय?
सगळ्या शारिरीक क्रिया सुरळीत असाव्या, शरीराची नियमितपणे आतून स्वच्छता होत रहावी, यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं, हे आपण सगळेच जाणतो. आता या वॉटर चॅलेंजमध्येही पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ३० दिवस नियमितपणे दररोज ४.५ लीटर पाणी प्यावे. हा सल्ला अनेक जण पाळत आहेत आणि कुठेही बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवत आहेत. ठराविक वेळानंतर थोडे थोडे पाणी पिऊन बाटली रिकामी करणे, हे त्यांचं अगदी नेमाने सुरु आहे. हे चॅलेंज स्विकारणारे काही जण म्हणत आहेत की त्यांना यामुळे वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत आहे. तर काही जणांच्या मते हे चॅलेंज खूपच परिणामकारक असून यामुळे शरीराची सूज कमी होऊन वेटलॉस तर होतच आहे, पण त्वचेवरही चमक येत आहे.

 

तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते दिवसातून दोन ते अडीच लीटर पाणी पिणे पुरेसं आहे. अतिजास्त पाणी प्यायल्याने हायपरहायड्रेशन किंवा वॉटर इनटॉक्सिकेशन होऊ शकते. यामध्ये थकवा, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, अस्वस्थता असे त्रास होऊ शकतात. शिवाय  शरीरातील सोडियम कमी होऊ शकते. यामुळे ब्रॅन डॅमेज होऊ शकतो किंवा मनुष्य कोमातही जाऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा  सल्ला न घेता असं कोणतंही चॅलेन्ज आंधळेपणाने करू नका, असं तज्ज्ञ सांगत आहेत.  

 

Web Title: Do you know 30 days water challenge? What is this new trend for weight loss? Expert's opinion about this health challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.