Join us  

कोण म्हणतं भातामुळे पोट सुटतं? फिटनेस एक्सपर्ट सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत; फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:15 AM

Weight Loss Tips : फिटनेस कोच यांनी या व्हिडिओमध्ये भात खाण्याची योग्य पद्धत सांगून याबाबतचे काही फॅक्ट्सस शेअर केले आहेत. 

जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या गोष्टींबाबत बोलतो तेव्हा अनेकांचे असे  म्हणणे असते की भात खाणं सोडायला हवं, भात खाल्ल्याने वजन वाढतं.  (Weight Loss Tips) बरेच लोक पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. जे रोजच्या आहारात भाताचा समावेश करून शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करतात. (Right Way To Eat Rice For Weight Loss)

फिटनेस कोच सिमरन यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओतून सांगितले आहे की वजन कमी करण्यासाठी भात खाणं सोडायचं यात काहीही तथ्य नाही. (Right Way To Eat Rice For Weight Loss) भात खाण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. फिटनेस कोच यांनी या व्हिडिओमध्ये भात खाण्याची योग्य पद्धत सांगून याबाबतचे काही फॅक्ट्स शेअर केले आहेत. 

फिटनेस विशेषज्ञ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, मी फॅट लॉस जर्नीमध्ये भात खाऊ शकतो का? हा सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की तुम्ही भात खाऊ शकता भात खाल्ल्याने लठ्ठपणा येत नाही. जास्त भात खाल्ल्याने  लठ्ठपणा वाढतो. म्हणूनच तुम्हाला भात किंवा कोणताही पदार्थ खाण्यापासून घाबरण्याची काही गरज नाही. फक्त त्याबाबतचं तुमचं सिलेक्शन स्मार्ट असायला हवं. 

भाताचा वजन वाढण्याशी काय संबंध आहे?

भात खाल्ल्याने वजनावर परिणाम होतो. पुढे कॅप्शनमध्ये लिहिले की, फिटनेस कोच सांगतात कोणत्याही गिल्टशिवाय आणि चिंता न करता भात खाण्याचा आनंद घेऊ शकता.

 

सगळ्यात आधी लंच किंवा डिनरला बसण्याच्या १० ते १२ मिनिटं आधी १ ग्लास पाणी किंवा ताक प्या नंतर सॅलेड खा, त्यानंतर डाळ खा. तांदूळाबरोबरच क्वाटिंटी कंट्रोलसुद्धा फॉलो करा. जास्तीत जासस्त डाळ आणि दह्याचे सेवन करा. 

वेट लॉस टिप्स

सिमरन यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हळूहळू अन्न चावून खा, जेवताना टिव्ही किवा फोनचा वापर करणं टाळा ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटींग करणार नाही. भात खाल्ल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका जाणवणार नाही, फिजिकली एक्टिव्ह राहाल. एक्टिव्ह राहण्याकडे जास्त लक्ष द्या, शरीराची हालचाल करा, बॅलेन्स डाएट घ्या आणि इंटरनेटवर पाहिलेल्या कोणत्याही गोष्टींना घाबरणं बंद करा. नेहमीपेक्षा जास्त सक्रिय राहून लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करा.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स