Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट

दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट

दिवाळीनंतर वजन कमी करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात येते आणि त्यासाठी वाट्टेल ते डाएट प्रकार केले जातात. पण तुम्हीही असं करत असाल तर सावधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 04:51 PM2021-11-16T16:51:39+5:302021-11-16T17:00:13+5:30

दिवाळीनंतर वजन कमी करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात येते आणि त्यासाठी वाट्टेल ते डाएट प्रकार केले जातात. पण तुम्हीही असं करत असाल तर सावधान...

Do you want to go on a weight loss diet because of weight gain on Diwali? Crisis on health, dieticians say | दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट

दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट

Highlightsवजन कमी करायचं तर योग्य पद्धतीने करा, चुकीच्या पद्धती ठरु शकतात घातकचुकीच्या डाएटमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता

दिवाळी झाली, भरपूर खाल्लं, मज्जा केली पण आता मात्र आपल्याला काहीही झालं तरी आपल्याला वजन कमी करायलाच हवं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तसं काहीही करु नका. आता फक्त दिवाळीच्या आधी जे करत होतात तेच करा. याचे कारण म्हणजे दिवाळीत आपले रुटीन, आहार सगळेच बदललेले असते आणि अचानक आपण वजन कमी करण्यासाठी जोरदार व्यायाम किंवा एकदम कडक डाएट सुरु केले तर ते अंगाशी येऊ शकते असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे म्हणणे आहे. दिवाळीत आहार-विहारात झालेला बदल आणि आता एकदम नव्याने पुन्हा होणारा बदल हा शरीराला झेपेलच असे नाही. त्यामुळे एकदम केवळ सॅलेड खाणे, बरेच तास काहीही न खाणे, केवळ फलाहार घेणे असे प्रयोग उपयोगाचे नाहीत. सुरुवातीला आपण दिवाळी आधी जो आहारविहार घेत होतो तोच कायम ठेवायला हवा. 

वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी योग्य पद्धत वापरायला हवी. यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैली यांचा ताळेबंध बांधायला हवा. हे तीनही व्यवस्थित असेल तर तुमच्या शरीरातील ताकद आणि वजन यांचे गुणोत्तर व्यवस्थित राहण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला पाठदुखी, मायग्रेम, रक्तदाब, वंध्यत्व, हार्मोनचे असंतुलन, अनिमित पाळी येणे अशा वेगवेगळ्या समस्या असतात. यांसाठी आपण डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला सगळ्यात आधी वजन नियंत्रणात आणायला सांगतात. यामध्ये बोन वेट म्हणजेच आपल्या हाडांचे वजन आणि मसल वेट म्हणजे स्नायूंचे वजन असे दोन घटक असतात. हे दोन्ही घटक योग्य प्रमाणात असतील तर तुम्ही तदुरुस्त असता. शरीराची ताकद आणि वजन योग्य प्रमाणात असेल तर खालील लक्षणे दिसतात...

१. तुम्हाला सतत गोड खावेसे वाटत नाही.
२. महिलांना मासिक पाळी नियमित येते
३. गाढ आणि चांगली झोप लागते
४. शरीरातील ऊर्जा वाढते
५. केस आणि त्वचा चांगली होते 
६. मूड चांगला राहतो. 
७. तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करु शकता
८. अॅसिडीटी, ब्लोटींग आणि बद्धकोष्ठता हे त्रास दूर होतात. 

(Image : Google)
(Image : Google)

 
यामुळे तुमचे आयुष्य नकळत आनंदी आणि आरोग्यदायी होते. पण तुम्ही अचानक वेगन, किटो, केवळ फळे आणि भाज्या खाणे, नुसते सूप घेणे, डिटॉक्स करणे, उपवास करणे यासारखी डाएट अचानक सुरु करता तेव्हा तुमचे वजन नक्की कमी होते पण त्याबरोबरच तुमचा ताकद आणि वजन यांचे गुणोत्तर कमी होते. त्यामुळे भविष्यात पुन्हा तुमचे वजन वाढत जाते. मग तुमची ताकद आणखी कमी होत जाते. असे झाल्यास तुमची अॅसिडीटी वाढते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारचे डाएट उपयोगाचे नाही ज्यामध्ये तुमच्या इतर आरोग्यावर, झोपेवर त्याचा परिणाम होतो. इतकेच नाही तर अशाप्रकारची डाएट करण्याने तुमचे वजन कमी होते असे तुम्हाला वाटतही असेल पण त्यामुळे तुम्हाला डायबिटीस, रक्तदाब यांसारख्या आजारांचा आणि संसर्गजन्य आजार होण्याचा धोका जास्त असतो. 
 

Web Title: Do you want to go on a weight loss diet because of weight gain on Diwali? Crisis on health, dieticians say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.