Join us  

बिना तेलाचा स्वंयपाक करण्याची सोपी ट्रिक; डॉक्टर सांगतात कमी तेलात चविष्ट स्वयंपाक करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 3:57 PM

Doctor Told How To Cook Without Oil : फिटनेस एक्सपर्ट आणि सर्टिफाईड न्युट्रिशनिस्ट डॉ. वनिता रहमान यांनी स्वंयपाक करण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगितली आहे.

स्वंयपाक करण्याची चुकीची पद्धत तुमचं शरीर बिघडवू शकते. आजकालच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो. हृदयाशी संबंधित अनेक समस्या  वाढतात आणि लठ्ठपणा वाढू लागतात. कमी तेलात स्वंयपाक करणंही खूप सोपं असतं.  (No Oil Cooking Tips)  फिटनेस एक्सपर्ट आणि सर्टिफाईड न्युट्रिशनिस्ट डॉ. वनिता रहमान यांनी स्वंयपाक करण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगितली आहे.  ज्यात तेलाचा वापर केला जात नाही ज्याला नो ऑईल कुकिंग असंही म्हटलं जातं. ज्यामुळे हाय बीपी, लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्या टाळता येतात. (Doctor Told How To Cook Without Oil And No Oil Cooking Benefits For Body)

डॉ. वनिता रहमान यांच्यामते  तेलाचा परिणाम तेल कोणत्या पद्धतीने काढण्यात आलं आहे यावर अवलंबून असते याची क्वालिटी कशी आहे, याचा वापर कसा करता येईल यावर अनेक गोष्टी अवलंबून असता. तेलात १०० टक्के फॅट आणि हाय कॅलरीज असतात. ज्याचे सेवन कमीत कमी प्रमाणातच करायला हवे. तुम्ही तेलाशिवाय टेस्टी आणि गरम  स्वंयपाक बनवू शकता. 

मुलं हट्ट करतात-नेहमी उलटं बोलतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला; आज्ञाधारी होतील मुलं

नो ऑईल-कुकिंग काय आहे? (What Is No Oil Cooking)

बिना तेलाचा स्वंयपाक करणं एक अशी पद्धत आहे ज्यामुळे कुकींगदरम्यान तेलाची आवश्यकता कमी लागते. या पद्धतीने टेस्टी आणि हेल्दी जेवण बनवू शकता. यात तेलाऐवजी इतर पर्यायी वस्तूंचा वापर केला जातो. या डाएटमध्ये सॅच्युरेडेट आणि ट्रांसफॅट कमी करून हार्ट डिसिजचा धोका कमी केला जाऊ शकतो. 

नो ऑईल कुकिंग फूडमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात.  ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  तेलात जसं की हाय फॅट फूड इंसुलिन रेजिस्टेंट करतात  बिना तेलाचे जेवण बनवल्यानं ब्लड शुगर कमी करण्यास मदत होते. तेलाचे अधिक सेवन केल्यानं फळं, भाज्या यांसारख्या पौष्टीक पदार्थांतून मिळणाऱ्या कॅलरीज कमी होतात.

बिना तेलाचा स्वंयपाक करण्यासाठी नॉनस्टिक भांड्याची गरज असते. बिना तेलाचे बेकिंग करण्यासाठी सिलिकॉन ओवनवेअर किंवा पार्चमेंट पेपरचा उपयोग करा. तेलाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. मध्यम ते कमी आचेवर भाज्या भाजून  घ्या. त्यात अन्न शिजवून घ्या. जेवणाच्या करण्याच्या  शेवटच्या स्टेजला तुम्हाला भांडी सतत हलवावी लागतील.  कमी तेलाचे स्वंयपाक करताना तुम्ही त्यात मॉईश्चर येण्यासाठी प्यूरी, भाजीचे देठ, दही या पदार्थांचे मिश्रण घालू शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स