Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

Weight Loss Due To No Sugar Diet: साखर खाणं कमी केलं की वजनही कमी होतं, असं तुम्ही ऐकलं असेलच... बघा हे कितपत खरं आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 06:13 PM2023-10-04T18:13:50+5:302023-10-04T18:14:39+5:30

Weight Loss Due To No Sugar Diet: साखर खाणं कमी केलं की वजनही कमी होतं, असं तुम्ही ऐकलं असेलच... बघा हे कितपत खरं आहे

Does a no sugar diet helps for weight loss? Benefits of avoiding sugar, Side effects of eating sweets and sugar | साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

Highlightsसाखरेबाबत जे काही आपण ऐकतो आहोत ते प्रत्यक्षात किती खरं आहे, असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो

हल्ली सोशल मिडियावर आपण साखरेबद्दल बरंच काही ऐकत आहोत. जसं की साखर खाणं बंद केलं की वजन कमी होतं, त्वचा आणि केस निरोगी होतात (Does a no sugar diet helps for weight loss?)... अशा अनेक चर्चा सध्या कानांवर येत आहेत. साखरेबाबत जे काही आपण ऐकतो आहोत ते प्रत्यक्षात किती खरं आहे, असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो (Benefits of avoiding sugar). म्हणूनच याविषयी आहारतज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा वाचायलाच पाहिजे. (Side effects of eating sweets and sugar)

 

साखरेविषयी सांगताना मंजिरी कुलकर्णी म्हणतात की साखर 'एम्प्टी कॅलरीज' या प्रकारात येते. म्हणजेच साखरेतून फक्त कॅलरीज मिळतात. त्याशिवाय अन्य कोणतेही पोषणमुल्ये खाखरेतून मिळत नाहीत.

छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

त्यामुळे साखर खाऊन शरीराला तसा कोणताही  फायदा  नाही. शिवाय त्यांनी सांगितलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखर हे 'अन्न' नाही. ते एक 'केमिकल' आहे. जे ऊसापासून तयार होतं. त्यामुळे हवंतर उसाचा रस प्या. पण साखर मात्र अजिबात नको. कारण एखाद्या ड्रग्सप्रमाणे साखर आपल्या शरीरावर परिणाम करत जाते. म्हणून साखर खाणं टाळलंच पाहिजे.

 

साखर न खाल्ल्याने वजन कमी होतं का?
साखर खाणं बंद केल्याने वजन कमी होतं का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 'हो'.

खिडक्यांसाठी पडदे घ्यायचेत? ३०० रुपयांत मिळेल मस्त जोडी, बघा ३ आकर्षक पर्याय

जे लोक भरपूर साखर खातात अशा लोकांनी जर साखर खाणं बंद केलं तर त्या लोकांचं वजन चांगलंच कमी होतं. पण जे लोक मुळातच साखर खूप कमी खातात, त्या लोकांनी साखर बंद केली तर त्यांच्या वजनात विशेष काही फरक पडणार नाही.
 

Web Title: Does a no sugar diet helps for weight loss? Benefits of avoiding sugar, Side effects of eating sweets and sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.