Join us

ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:37 IST

How to Loss Belly Fat Using Cumin Water : या पाण्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते.

स्वयंपाकघरात वापरला जाणारं  जीरं  तब्येतीसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. जीरं वजन करण्यासाठी एक उत्तम प्राकृतिक उपाय आहे. (Weight Loss Tips) यात अनेक गुण असतात ज्यामुळे पचनक्रिया आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते, फॅट्स कमीत प्रमाणात तयार होतात. सकाळी उठून तुम्ही जीऱ्याचं पाणी पिऊ शकता. (How to Loss Belly Fat Using Cumin Water)

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार जीऱ्यांच्या पाण्याने मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत होते आणि वजनही वेगाने कमी होते. रोज या पाण्याचे सेवन केल्यास चरबी कमी होण्यास मदत होते. जीऱ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे स्किन खराब होण्याचा धोका टळतो. (Ref) याव्यतिरिक्त यात व्हिटामीन ई, आयर्न आणि मॅग्नेशियम असते. जीरं वजन कमी करण्यासाठी आणि वेट लॉस  जर्नीसाठी फायदेशीर ठरते. 

1) मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो

जीऱ्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे वेगाने कॅलरीज बर्न होतात. याशिवाय शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. या वजन घटवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. या पाण्याच्या सेवनाने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2) पचनक्रिया चांगली राहते

जीऱ्यातं पचन एंजाईम्स असतात.  ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. गॅस, एसिडीटीच्या समस्या टाळण्यास मदत होते.  वजन घटवण्यासही मदत होते. 

उन्हाळ्यात तुळस सुकली-नवीन पानंच येईना? कुंडीत 'हा' पदार्थ मिसळा; आठवडाभरातच तुळस होईल हिरवीगार

3) फॅट बर्निंग गुण

यात एंटीऑक्सिडेंट्स आणि एंटी इफ्लेमेटरी गुण  असतात. यात थायमो क्विनोन नावाचे कम्पाऊंड असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. फॅट बर्निंग प्रकिया वेगाने होण्यास मदत होते. 

4) क्रेव्हिंग कंट्रोल

जीऱ्यांमुळे क्रेव्हींग कंट्रोल होण्यास मदत होते. ज्यामुळे अधिक खाणं टाळतात येतं कॅलरीज कमी घेता येतात. अधिक कॅलरीज घेणं टाळायला हवं.  एक ग्लास पाण्यात १ चमचा जीरं घालून  रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा. सकाळी उठून गाळून या पाण्याचे सेवन करा.

कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

5) जीरं आणि लिंबू

एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा जीरं पावडर आणि अर्धा लिंबू घालून याचा रस मिसळून घ्या. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायल्याने बरेच फायदे मिळतील. एक कप पाण्यात १ चमचा जीरं घालून उकळून घ्या. नंतर पाणी अर्ध झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य