ग्रीन टी हा चहाचा आरोग्यदायी प्रकार आता अनेकांच्या ओळखीचा झाला आहे. तरीही ग्रीन टी हा आपल्यासाठी नवीन आणि आधुनिक असा पेयप्रकार आहे. पण तिकडे चीनमधे चायनिज औषधांमधे ग्रीन टी चा उपयोग मोठ्या प्रमाणावर अगदी प्राचीन काळापासून केला जात आहे. डोकेदुखी ते जखमा बऱ्या करण्यासाठी ग्रीन टी चा वापर तिकडे केला जातो.
आपल्याकडे ग्रीन टीचा उपयोग प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी म्हणून केला जातो. अर्थात तो करताना त्यामागील शास्त्रीय कारणं वगैरे तपासली जात नाही. अनेकजण तर केवळ ऐकीव माहितीवर दिवसातून अनेक वेळा ग्रीन टीचं सेवन करतात. खरंतर ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी कसा आणि किती फायदेशीर आहे याबाबत बरंच संशोधन झालं आहे. हे संशोधन वजन कमी करण्यामधील ग्रीन टीच्या भूमिकेची चिकित्सा करतं. तसेच वजन कमी करण्याबाबत ग्रीन टीच्या मर्यादाही दाखवतं. वजन कमी करण्यासोबतच ग्रीन टीचा उपयोग आणखी कोणत्या प्रकारच्या आजारात होतो याबाबतही अभ्यास झालेला आहे. ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते म्हणजे कशी हे आधी समजून घेऊन त्याचा वापर डोळसपणे केला तर वजन कमी करण्याच्या उद्देशास नक्कीच फायदा मिळेल.
वजन घटवणे आणि ग्रीन टी
सेवन केलेल्या अन्नाचं, पेयांचं ऊर्जेमधे रुपांतर करण्याचं काम आपली पचनक्रिया करत असते. ग्रीन टीचा उपयोग पचनक्रिया सुधारण्या कामी होतो. वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. ट्रस्टेड सोर्स या संशोधन संस्थेनं केलेल्या एका पाहाणीचा अहवाल २०१० मधे प्रकाशित केला होता, त्यानुसार ग्रीन टी मधे असलेल्य कॅफिन या घटकाचा वजन घटण्यावर आणि वजन नियंत्रित ठेवण्यावर कमी प्रमाणात पण सकारात्मकरित्या परिणाम घडतो. अगदी अलीकडच्या ट्रस्टेड सोर्सच्या पाहाणीचा अहवाल सांगतो की, ग्रीन टीच क्लिनिकली उपयोग हा वजन वजन घटवण्यासाठी आणि स्थूलतेवर केला जात आहे. एक कप ग्रीन टीमधे मोठ्या प्रमाणावर कॅफिनचं प्रमाण आढळून आलं आहे. वजन घटवण्यासाठी ग्रीन टी चा विचार केला जातो तेव्हा प्रामुख्यानं एक बाब लक्षात ठेवायला हवी की ग्रीन टीचा वजन घटण्यावर थोडा परिणाम होतो. हा परिणाम वजन घटवण्याच्या आरोग्यदायी आहार, व्यायाम या इतर आरोग्यदायी पर्यांयापेक्षा तुलनेनं कमी आहे. रोज नियमित व्यायाम करणं, भरपूर भाज्या, फळं यांचा समावेश असलेला आहार घेणं ही वजन घटवण्याची प्रभावशाली पध्दत आहे. या पध्दतीला एक प्रकारचं सकारात्मक पोत्साहन ग्रीन टी देतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घ्या असं म्हटलं जातं. पण याचा अर्थ वजन कमी करण्यासाठी इतर कोणतेही उपाय न करता फक्त ग्रीन टी घ्या असा होत नाही.
ग्रीन टी किती घ्यावा?
दिवसभरातून दोन ते तीन कप ग्रीन टी घेणं पुरेसं होतं. यापेक्षा जास्त ग्रीन् टी घेणं हा अतिरेक समजला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन टी आता बाजारात उपलब्ध आहे. पण वजन कमी करण्यासाठी प्रामुख्यानं हा प्लेन आणि कमीत कमी प्रक्रिया केलेला ग्रीन टी घ्यावा. कारण या प्रकारच्या ग्रीन टी मधे मोठ्या प्रमाणात पोषणमूल्यं असतात. ग्रीन टी पिणं हा आरोग्यासाठी लाभदायकच आहे. पण यातल्या कॅफिन या घटकाचा विचार करता ग्रीन टी पिण्याचा अतिरेक नुकसानकारक ठरतो. ग्रीन टी घेतल्यानं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं शिवाय हदयाचं आरोग्य सुधारतं. ग्रीन टी मधे ब जीवनसत्त्वं, फोलेट,मॅग्नेशिअम, फ्लेवोनॉइडस आणि इतर अॅण्टिऑक्सिडण्टस असतात. ज्याच्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतं, हदयाचं कार्य सुधारतं, अल्झायमर या आजाराचा धोका कमी होतो, टाइप २ चा मधुमेह नियंत्रित राहातो.
ग्रीन टी म्हणजे ?
कॅमेलिआ सायनेसिस या वनस्पतीपासून ग्रीन, ब्लॅक, व्हाइट आणि ओलॉंग प्रकारचे चहा तयार होतात. ग्रीन टी हा कॅमेलिआ सायनेसिस या वनस्पतीची पानं उकळून केला जातो. इतर चहाचे प्रकार करताना जी आंबवण्याची प्रक्रिया केली जाते ती ग्रीन टी करताना होत नाही. त्यामुळे ग्रीन टीमधे भरपूर प्रमाणात अॅण्टिऑक्सिडण्टस आणि पोषणमूल्यं टिकून राहातात.