अन्न पचण्यापासून ते रक्ताभिसरण नीट होण्यापर्यंत पाणी हे शरीरात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. शरीराच्या पोषणासाठी पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी पिण्याची गरज आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक कार्ये योग्य प्रकारे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार माणसाला घेरतात. योग्य प्रमाणात पाणी न पिणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
सध्या जे लोक आरोग्याबाबत जागरूक आहेत आणि ज्यांना स्लिम-फिट बॉडी हवी आहे, त्यांच्यामध्ये पौष्टिक आहाराव्यतिरिक्त पाणी पिण्याच्या पद्धतीबद्दलही चर्चा आहे. अनेकवेळा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते का? याचं अचूक उत्तर न्यूट्रशिनिस्टने दिलं आहे. ते म्हणतात की, जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी पिणे हे जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फायदेशीर आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतं, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. त्याच वेळी, जेवणापूर्वी दोन ग्लास पाणी प्यायल्याने अनावश्यकपणे जास्त खाण्याची सवय सुटण्यास मदत होते.
लठ्ठपणा यामुळे टाळता येतो आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. जेवणाच्या अर्धा तास आधी पुरेसे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत होते आणि अन्नाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीराला कमी कॅलरीज मिळतात आणि वजन कमी करण्याच्या अंतर्गत प्रक्रियेला वेग येतो.
जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले पाणी जर योग्य प्रमाणात प्यायले गेले नाही तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यास शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर योग्य वेळी योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया एक्टिव्ह होते आणि शरीरातील फॅट आणि शुगर कंट्रोल होते. तसेच, जेवणापूर्वी पाणी पिणं तुम्हाला कोल्ड्रिंक्स, सोडा, ज्यूस इत्यादींसह सर्व प्रकारचे उच्च कॅलरी पेये पिण्यापासून प्रतिबंधित करतं. यामुळे लठ्ठपणा आणि अनियंत्रित वजन कमी होण्यासही मदत होते. पोषण तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी अर्धा लीटर कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम २४ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतं.
पचन सुधारतं, कॅलरी बर्न करण्यास मदत करतं. या शारीरिक हालचाली वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. मात्र अचानक जास्त पाणी प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिण्याव्यतिरिक्त आहार आणि जीवनशैलीत आणखी काही महत्त्वाचे बदल करायला हवेत.