Join us

वजन वाढेल या भीतीने भात खाणं सोडलं? भात खाऊन खरंच पोट सुटतं? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 17:51 IST

Health Tips About Eating Rice: वजन वाढेल, पोट सुटेल या भीतीने अनेकजण भात खाणं टाळतात. पण भात खरंच एवढा वाईट आहे का बरं? (Does eating rice really responsible for weight gain and increase in belly fat?)

ठळक मुद्देकाही जण भाताला एवढं घाबरतात की भाताचा एक लहानसा घास घ्यायलाही त्यांना नकोसं वाटतं.

वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते. आणि ती गोष्ट म्हणजे ते सगळे जण भात खाणं एकतर बंद करतात किंवा कमी प्रमाणात खातात. काही जण भाताला एवढं घाबरतात की भाताचा एक लहानसा घास घ्यायलाही त्यांना नकोसं वाटतं. पण खरंच तुम्ही ज्याला एवढं घाबरत आहात, तो भात तुमचं वजन, पोटावरची चरबी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो का,(Does eating rice really responsible for weight gain and increase in belly fat?) याविषयी तज्ज्ञ लोकांनी मांडलेली मतं एकदा वाचायलाच पाहिजेत..(correct method of eating rice)

 

भात खाल्ल्याने वजन वाढतं का?

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन यांनी दिलेल्या माहितीनुसार भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. म्हणजेच भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगात वाढते. याशिवाय भातामधून भरपूर प्रमाणात कॅलरी मिळतात. त्यामुळे जर त्या शरीरातर्फे उपयोगात आणल्या गेल्या नाहीत तर त्या फॅट्सच्या स्वरुपात शरीरात साचून राहायला सुरुवात होते.

चरबीचे थर साचून दंड खूपच जाडजूड दिसतात? ५ व्यायाम करा- काही दिवसांतच हात दिसतील सुडौल

Applied Physiology and Nutrition Metabolism यांच्या अभ्यासानुसार जर भातासोबत आपण जास्त कॅलरी देणारे वेगवेगळे पदार्थ खात असू तर त्यामुळेही वजन वाढते. भाताच्या बाबतीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये फायबरचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे भात खल्ल्यानंतर काही वेळातच तुम्हाला भूक लागू शकते आणि ओव्हरइटिंगचे प्रमाण वाढते. गरजेपेक्षा जास्त खाणं झालं तर साहजिकच वजन वाढते. 

 

वजन वाढू नये म्हणून भात खाण्याची योग्य पद्धत

काही नियम पाळून जर तुम्ही भात खाल्ला तर त्यामुळे नक्कीच वजन वाढत नाही. ते नियम नेमके कोणते ते पाहा..

१. भात खायचा असेल तर तो नेहमी दुपारच्या जेवणात खावा. कारण भातामधून खूप जास्त कॅलरी मिळतात आणि त्या व्यवस्थित उपयोगात येण्यासाठी शरीराची योग्य हालचाल होणे गरजेचे आहे.

तब्येत सुधारल्यामुळे जुनं ब्लाऊज घट्ट होतंय? १ सोपी ट्रिक, ब्लाऊज होईल परफेक्ट मापाचं

२. भातासोबत तेलकट, तुपकट पदार्थ खाणं टाळावं. त्याऐवजी भाज्या, वरण, पनीर असे प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत.

३. भात नेहमी एका ठराविक प्रमाणातच खा. तसेच त्यावर खूप जास्त तूप घालू नका. यामुळे कॅलरी वाढत जातात.

४. कुकरमध्ये शिजवलेला भात खाण्याऐवजी पातेल्यात शिजवलेला भात खावा. कारण यामुळे त्याच्यातले जास्तीचे स्टार्च कमी होते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स