Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डाएटमध्ये नुसती फळे खाऊन वजन कमी होते का ? पाहा एक्स्पर्ट सांगतात....

डाएटमध्ये नुसती फळे खाऊन वजन कमी होते का ? पाहा एक्स्पर्ट सांगतात....

Does Fruit Help You Lose Weight : How Effective Is a Fruit for Weight Loss : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नुसती फळं खाऊ नका तर .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 07:35 PM2024-06-27T19:35:35+5:302024-06-27T19:46:07+5:30

Does Fruit Help You Lose Weight : How Effective Is a Fruit for Weight Loss : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नुसती फळं खाऊ नका तर .....

Does Fruit Help You Lose Weight How Effective Is a Fruit for Weight Loss Does Eating Fruit Help With Weight Loss | डाएटमध्ये नुसती फळे खाऊन वजन कमी होते का ? पाहा एक्स्पर्ट सांगतात....

डाएटमध्ये नुसती फळे खाऊन वजन कमी होते का ? पाहा एक्स्पर्ट सांगतात....

आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी रोज किमान एक तरी फळं खाणे महत्वाचे असते. बहुतेकवेळा आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतो. असे डाएट करताना फळांचा त्यात खूप मोठा सहभाग असतो. फळांशिवाय डाएट पूर्ण होऊच शकत नाही. आजकाल बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. जिममध्ये तासनतास घाम गाळतात. खाण्यापिण्याच्या  सवयीत बदल करतात. पण, खाण्यापिण्याचे प्रमाण कमी केल्याने तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. म्हणूनच आपण नेहमी निरोगी मार्गाने वजन कमी केले पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात विविध प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. दररोज फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते(How Effective Is a Fruit for Weight Loss).

अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी फळे खाणे नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळं (Fruits for weight loss) खातात. फळे खाऊन वजन कमी करण्यात कशी मदत होते ते पाहूयात. दिल्लीच्या Ecentric Diets Clinic च्या आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जर आहारात फळांचे प्रमाण अधिक असले तर लठ्ठपणाचा धोका तसेच त्याशी संबंधित इतर अनेक आजार कमी होऊ शकतात(Does Eating Fruit Help With Weight Loss).

फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते ?

१. फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण फारच कमी असते, परंतु फायबर भरपूर प्रमाणांत असते. यामुळे डाएटमध्ये फळे खाल्ल्याने आपले पोट काही काळासाठी भरलेले वाटते. पोट भरलेले वाटल्यामुळे आपण फारसे काही खात नाही. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते. 

२. फळांमध्ये असणाऱ्या भरपूर प्रमाणातील फायबरमुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यास मदत होते. फळांमुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. याचा उपयोग वजन नियंत्रणात होतो. 

३. फळांमध्ये पोषक घटक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वजन कमी करण्यात फळे महत्वाची भूमिका बजावतात. 

स्टार्स-सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं..

८५ वर्षांच्या आहेत अभिनेत्री हेलन, पाहा त्या करतात तो भन्नाट व्यायाम, फिटनेसचं सिक्रेट..

४. फळामध्ये भरपूर फायबर असते जे पोटाच्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते आणि वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यातही फळ महत्त्वाची भूमिका बजावते.

५. फळांमध्ये अशी काही जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जी फळे खाल्ल्यामुळे आपल्याला शारीरिक ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

६. फळे शरीरासाठीही महत्त्वाची असतात कारण त्यात असलेली नैसर्गिक गोडवा किंवा साखर शरीरासाठी फायदेशीर असते.

खरंच, जस्सी जैसी कोई नही! अवघ्या ६ महिन्यांत मोना सिंगने १५ किलो वजन कमी केलं...

वजन कमी करण्यासाठी कोणती फळे खावीत ? 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. यासाठी तुम्ही सिझनल फळं खाण्यावर अधिक भर दिला पाहिजे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात सफरचंद, संत्री, द्राक्षे, ब्लूबेरी, पिअर, स्ट्रॉबेरी आणि किवी यांचा समावेश करू शकता. फायबरयुक्त फळांचा डाएटमध्ये समावेश केल्याने दिर्घकाळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे सारखी भूक लागत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यास अधिक मदत होते.

Web Title: Does Fruit Help You Lose Weight How Effective Is a Fruit for Weight Loss Does Eating Fruit Help With Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.