Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक तूप खाण्यावर बराच भर देतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:30 IST2024-12-28T13:26:27+5:302024-12-28T13:30:25+5:30

Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक तूप खाण्यावर बराच भर देतात.

Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : Ghee And Weight Gain | तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

तूप खाल्ल्यानं वजन वाढतं का? तुपाचे सेवन आणि वजन वाढ यांचा काय संबंध आहे, समजून घ्या.....

तूप (Ghee) हा भारतीय आहारातील महत्वपूर्ण भाग आहे. आयुर्वेदीक आहारात याचे महत्वपूर्ण स्थान आहे. तूप खाल्ल्यानं फक्त जेवणाची चव वाढत नाही तर तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. यात हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे ओव्हरऑल तब्येतीला फायदा होतो. ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक तूप खाण्यावर बराच भर देतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्यानं वजन वाढू शकतं. हे कितपत खरं आहे ते समजून घेऊया. (Does Having Ghee In Winter Cause Weight)

एक्सपर्ट्सच्यामते तूप खाणं तब्येतीसाठी बरंच फायदेशीर ठरतं. यात ओमेगा ३ आणि ओमेगा ५ फॅटी एसिड्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. 

अडजस्टेबल पैंजणांचा खास ट्रेंड; १० नाजूक सुंदर डिजाईन्स, सुंदर-उठून दिसतील पाय

याव्यतिरिक्त यात व्हिटामीन डी, ई, के यांसह एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे तब्येतीली बरेच फायदे मिळतात आणि पचनक्रियाही चांगली राहते. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. सूज कमी होण्यासही मदत होते.

एक्सपर्ट्स सांगतात की एक चमचा तूपात १२० ते १३० कॅलरीज असतात आणि १४ ते १५ ग्रॅम फॅट्स असतात.   गरजेपेक्षा जास्त तुपाचे सेवन केल्यानं कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि एकूण कॅलरीज सेवन वाढते.  जर तुम्ही तुपासारख्या उच्च कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर फिजिकल एक्टिव्हीज करा ज्यामुळे वजन वाढणार नाही.

Web Title: Does Having Ghee In Winter Cause Weight Gain : Ghee And Weight Gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.