दर महिन्याला पाळी येण्याची तारीख मागे पुढे होणं हे खूप सामान्य आहे. पण नेहमीच पाळी उशीरा येत असेल २ ते ३ महिन्यांच्या कालावधीनंतर पाळी येत असेल तर महिलांच्या मनात अनेक समज गैरसमज तयार होतात. अशात वजन वाढलं किंवा पोट सुटलं तर पाळी अनियमित आल्यानं वजन वाढलं असावं अशा शंका मनात येतात. पाळी नियमित न येणं आणि वजन वाढ याचा काही संबंध आहे का याबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. (Does late period cause weight gain)
डॉ. राजश्री तायशेटे यांच्यामते वजनवाढ आणि अनियमित मासिक पाळी यात संबंध आहे. बऱ्याचदा हे वजन पोट आणि मांड्यांच्या वरच्या भागात दिसून येतं. यामुळे वेस्ट हिप रेशो चेंज होतो. हा बदल झाल्यानंतर पाळी अनियमित होते. याचं कारण असं की हे शरीरातलं पेरिफेरल फॅट्स टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनमुळे तयार होतं.
पीसीओडी, पीसीओएसवर सगळ्यात मोठा उपाय वजन कमी करणं हाच आहे. ३ ते ४ महिन्यात महिला जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यानंतर नंतर पाळी नियमित होते आणि आरोग्याच्या बऱ्याच समस्या कमी होतात. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं किंवा वाढू न देणं हे तितकंच आवश्यक आहे.
याशिवाय जास्त ताणामुळेही पीरियड्स उशीर होऊ शकतात किंवा चुकतात. जास्त व्यायाम हे देखील मासिक पाळी येण्यास उशीर होण्याचे कारण असू शकते. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. हे गर्भनिरोधक औषधांच्या वापरामुळे देखील होऊ शकते. स्त्री रजोनिवृत्तीच्या जवळ असली तरीही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. थायरॉईड, पीसीओएस किंवा इतर कोणत्याही हार्मोनल विकारांमुळेही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो.
ओटी पोट लटकतंय? पोटाची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल
बहुतेक स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीत 2 ते 3 किलो वजन वाढवतात. पण हे वजन सामान्यतः पाण्याचे वजन असते आणि मासिक पाळी संपल्यानंतर अतिरिक्त वजन स्वतःच कमी होते. हे बदल साधारणपणे मासिक पाळी येण्याच्या ३ ते ४ दिवस आधी दिसतात.