Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > लिंबूपाण्याचे ग्लास पचवले पण पोट थुलथुलीतच आणि वजनही भरमसाठ? तुम्ही चुकीच्या वेळी लिंबूपाणी पिताय..

लिंबूपाण्याचे ग्लास पचवले पण पोट थुलथुलीतच आणि वजनही भरमसाठ? तुम्ही चुकीच्या वेळी लिंबूपाणी पिताय..

Does Lemon Water Help You Lose Weight? Bloating problem Solved : लिंबू पाणी कधी, कोणत्या वेळेत प्यावे? यामुळे वजन खरंच कमी होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 05:09 PM2024-06-12T17:09:07+5:302024-06-12T17:10:04+5:30

Does Lemon Water Help You Lose Weight? Bloating problem Solved : लिंबू पाणी कधी, कोणत्या वेळेत प्यावे? यामुळे वजन खरंच कमी होईल?

Does Lemon Water Help You Lose Weight? Bloating problem Solved | लिंबूपाण्याचे ग्लास पचवले पण पोट थुलथुलीतच आणि वजनही भरमसाठ? तुम्ही चुकीच्या वेळी लिंबूपाणी पिताय..

लिंबूपाण्याचे ग्लास पचवले पण पोट थुलथुलीतच आणि वजनही भरमसाठ? तुम्ही चुकीच्या वेळी लिंबूपाणी पिताय..

बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, अपुरी झोप यासह इतर कारणांमुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो (Weight Loss). वजन वाढणे ही एक जागतिक समस्या बनली आहे (Fitness). यावर उपाय म्हणून आपण विविध गोष्टी करीत असतो. पण वजन कमी नाही झाल्यास शरीरात गंभीर आजारांचा धोका वाढू लागतो (Lemon Water). अशावेळी वेट लॉस शिवाय पर्याय उरत नाही.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. जिम, डाएट आणि व्यायाम. शिवाय काही घरगुती उपायही करून पाहतो. ज्यात लिंबू पाण्याचा देखील समावेश आहे. पण वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी कधी प्यावे? यामुळे वजन खरंच कमी होते का? चुकीच्या पद्धतीने लिंबू पाणी प्यायल्यास शरीराला हानी पोहचू शकते का?(Does Lemon Water Help You Lose Weight? Bloating problem Solved).

लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?

द हेल्थ साईट. कॉमच्या वेबसाईटनुसार, अनेक लोक पोटाची चरबी करण्यासाठी लिंबू पाणी पितात. पण तरीही काहींचे वजन कमी होत नाही. असे का होते? लिंबू पाणी प्यायल्याने फॅट्स का बर्न होत नाही? याचा विचार आपणही केलाच असेल. जर आपण चुकीच्या पद्धतीने लिंबू पाणी पीत असाल तर, वजन कमी होणार नाही.

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी कधी प्यावे?

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण लिंबू पाणी पिऊ शकता. यासाठी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा, आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते . यामुळे शरीरात अडकलेले हानिकारक घटक आणि विषारी घटक साफ होतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

थंड पाण्यासोबत लिंबाचा रस का पिऊ नये?

कोमट पाणी शरीराला आतून लवकर स्वच्छ करण्याचे काम करते. तसेच फॅट्स वितळण्यास मदत होते. कोमट पाणी चयापचय बुस्ट करते. त्यामुळे थंड ऐवजी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय लिंबू पाणी पिऊ नका

वजन कमी करण्यासाठी नियमित लिंबू पाणी घेत असाल तर, त्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. लिंबू पाणी प्यायल्याने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा आरोग्य समस्या उद्भवत नाही याची संपूर्ण माहिती घ्यावी. तसेच, ऋतूनुसार लिंबू पाण्याचे सेवन करा.

Web Title: Does Lemon Water Help You Lose Weight? Bloating problem Solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.