Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

Does sweating lead to fat loss : The relation between sweat rate and weight loss when sweat is dripping off the body : खूप एक्सरसाइज करून घाम गाळल्याने वजन कमी होते हे योग्य की अयोग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 07:27 PM2024-08-22T19:27:28+5:302024-08-22T19:44:53+5:30

Does sweating lead to fat loss : The relation between sweat rate and weight loss when sweat is dripping off the body : खूप एक्सरसाइज करून घाम गाळल्याने वजन कमी होते हे योग्य की अयोग्य?

Does sweating make you lose weight Does Sweating Help You Burn More Calories | झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

बदलत्या काळानुसार आजकाल सगळेच आपल्या वजनाच्या बाबतीत सजग झाले आहेत. सतत वाढणारे वजन ही सध्याची खूप मोठी कॉमन समस्या आहे. वाढलेल्या वजनामुळे केवळ आपलं शरीरच बेढब दिसत नाही तर त्याचबरोबर अनेक आरोग्य समस्या देखील उद्भवतात. वाढत्या वजनामुळे शरीरातील चरबी तर वाढतेच, पण त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. वाढणारे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करुन पाहतो. वजन कमी करण्यासाठी आपण शक्यतो डाएट आणि एक्सरसाइज या दोन गोष्टी करतो(Does sweating make you lose weight).

जर आपले वजन वाढत असेल तर आपण ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करतो. परंतु वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून राहणे योग्य नाही, योग्य डाएट सोबतच काही एक्सरसाइज (Can Sweating Help You Lose Fat?) देखील करावे लागतात. जेणेकरून अतिरिक्त कॅलरीज बर्न करता येतील. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करताना अनेकांचा असा समज असतो की, जितका आपण एक्सरसाइज करताना घाम गाळू तितके लगेच आपले वजन कमी होते किंवा फॅट्स बर्न होतात. खूप घाम गाळल्याने आपल्या शरीरातील चरबी जळून जाते, त्यामुळे एक्सरसाइज करताना खूप घाम गाळावा असा काहीजणांचा समज असतो. परंतु घाम गाळल्याने खरंच आपले वजन कमी होते का ? याबाबत न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे(Does Sweating Help You Burn More Calories?).

खूप घाम गाळण्याने वजन कमी होते का ?

वजन कमी करण्याच्या बाबतीत, बऱ्याच लोकांना असे वाटते की, खूप घाम गाळल्यामुळे वजन कमी होते. परंतु असे नसून घामाने फक्त आपल्या शरीरातील  पाण्याचे वजन कमी होते शरीरातील चरबी आहे तशीच राहते. घाम येणे हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा शरीर गरम होते तेव्हा घाम येतो ज्यामुळे शरीर थंड होण्यास मदत होते. त्याचा चरबी कमी होण्याशी थेट संबंध नाही.

५ पोटभरीचे पौष्टिक पर्याय, पोट तर भरेल - वजनही वाढणार नाही, भूक भूकही होत नाही...

शरीरातील चरबी कमी करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ?

चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे कॅलरीजची कमतरता. जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कॅलरीजच्या गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेता, तेव्हा शरीर आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शरीरातील स्टोअर करुन ठेवलेल्या चरबीचा वापर करते. या प्रक्रियेमुळे शरीरातील चरबी कालांतराने कमी होते. एक्सरसाइज, विशेषत: एरोबिक्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. घाम येणे हा या प्रक्रियेचा एक भाग आहे, परंतु त्याचा चरबी कमी होण्यावर थेट परिणाम होत नाही.

१. श्वास घेण्याची तंत्रे आणि वजन कमी होणे :- 

श्वासोच्छवासाचे तंत्र, जसे की प्राणायाम, वजन कमी करण्यात मदत करू शकतात. खोल श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारतो. हेल्दी आणि योग्य प्रकारे कार्य करणारी चयापचय क्रिया शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, प्राणायाम सारखी तंत्रे तणाव कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे Emotional Eating कमी केले जाते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

२. उपवास :- 

उपवास ही एक जुनी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीरातील चरबी जाळण्यास मदत करू शकते. जेव्हा तुम्ही ठराविक कालावधीसाठी खात नाही, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरण्यास सुरुवात करते.अधूनमधून उपवास करण्याच्या अशा सवयीमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते. विशेषत: जेव्हा तुम्ही नियमित एक्सरसाइज आणि उपवास एकत्रितपणे करता तेव्हा हे तंत्र वजन कमी करण्यात खूप प्रभावी ठरू शकते.  

निष्कर्ष :- 

हे स्पष्ट आहे की खूप घाम गाळल्याने वजन कमी होत नाही. हा एक प्रकारचा गैरसमज आहे ज्यावर बरेच लोक विश्वास ठेवतात. याउलट, योग्य श्वासोच्छवासाचे तंत्र आणि उपवासाच्या पद्धतींचा वापर केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, असे न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांचे म्हणणे आहे.


Web Title: Does sweating make you lose weight Does Sweating Help You Burn More Calories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.