शरीराची हानी भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. सर्दी- खोकला- अंगदुखी असा त्रास होत असला तरीही हळदीचं दूध घेतलं जातं. त्यामुळेच हिवाळ्यात सर्दी- खोकल्याचा संसर्ग असल्याचं प्रमाण जास्त असल्याने या दिवसांत हळदीचं दूध घेणं उत्तम मानलं जातं. कोरोना काळातही हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे आपण अनुभवले आहेत. पण अनेकांना हळदीचं दूध घ्यायला आवडत नाही. म्हणूनच तर हळदीचं दूध न पिताही शरीराला त्याचे लाभ मिळावेत, यासाठी एक चांगला पर्याय ( best option for turmeric milk) भाग्यश्रीने सुचवला आहे.
भाग्यश्रीने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आजारी नवऱ्याला हळदीचं दूध देताना दिसत आहे. भाग्यश्रीच्या पतीची काही दिवसांपुर्वीच एक शस्त्रक्रिया झाली.
फक्त ४ पदार्थ आणि चवदार- खमंग पुलाव मसाला तयार, पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी
त्यामुळे शरीराच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ती त्यांना हळदीचं दूध देत आहे. हळदीचं दूध घेणं आवडत नसेल तर दुधाऐवजी पाणी घ्या. त्यात हळद टाकून उकळवा आणि थोडंसं तूप घाला. हळदीचं दूध प्यायल्याने जेवढे फायदे मिळतात, तेवढेच फायदे हळदीचा हा काढा घेतल्यानेही मिळतात, असं भाग्यश्री सांगते आहे.
हळदीचं दूध किंवा काढा पिण्याचे फायदे
१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
२. शरीराची एखादी जखम असो किंवा हाडांचं दुखणं, ते लवकर भरून काढण्यासाठी उत्तम घरगुती उपाय.
आजोबांसोबत डान्स करायला आजींचा नकार, मग आजोबांनी पाहा काय केली युक्ती... व्हिडिओ व्हायरल
३. हळदीमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं.
४. हळदीतून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी देखील योग्य प्रमाणात मिळतं.