Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात वजन वाढण्याची ६ कारणं, लठ्ठपणा टाळून वजन आटोक्यात ठेवण्यासाठी....

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात वजन वाढण्याची ६ कारणं, लठ्ठपणा टाळून वजन आटोक्यात ठेवण्यासाठी....

6 Main Reasons For Weight Gain Or Obesity: तुमचंही वजन सातत्याने वाढतच असेल तर ही काही कारणं जबाबदार आहेत का, ते एकदा बघा...( how to control weight?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 05:46 PM2024-09-12T17:46:11+5:302024-09-12T17:47:44+5:30

6 Main Reasons For Weight Gain Or Obesity: तुमचंही वजन सातत्याने वाढतच असेल तर ही काही कारणं जबाबदार आहेत का, ते एकदा बघा...( how to control weight?)

dr jagannath dixit explains 6 main reasons for weight gain or obesity, how to control weight | डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात वजन वाढण्याची ६ कारणं, लठ्ठपणा टाळून वजन आटोक्यात ठेवण्यासाठी....

डॉ. जगन्नाथ दीक्षित सांगतात वजन वाढण्याची ६ कारणं, लठ्ठपणा टाळून वजन आटोक्यात ठेवण्यासाठी....

Highlights जे लोक कायम तणावामध्ये असतात किंवा ज्यांना नैराश्याचा त्रास आहे अशा लोकांनाही वजन वाढीचा त्रास होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यानेही वजन वाढते.  

वजनवाढीची समस्या हल्ली बऱ्याच जणांना भेडसावत आहे. बऱ्याच घरातली लहान मुलंदेखील लठ्ठ या प्रकारात मोडणारी आहेत. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. पण तरीही म्हणावा तसा परिणाम वजनामध्ये दिसून येत नाही (6 Main Reasons For Weight Gain Or Obesity). म्हणूनच डॉ. जगन्नाथ दीक्षित (Dr. Jagannath Dixit) यांनी वजनवाढीची काही कारणं सांगितलेली आहेत, ती तुमच्या बाबतीतही लागू होतात का हे एकदा तपासून पाहा... ( how to control weight?)

 

वजन का वाढतं?

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी वजनवाढीची कारणे नेमकी कोणती, याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बघा कशामुळे तुमचं वजन वाढू शकतं...

भाग्यश्री सांगते प्रोटीन्सचा खजिना असणाऱ्या पॅटीसची खास रेसिपी! अतिशय चटपटीत- भरपूर पौष्टिक 

१. अनुवंशिकता हे वजनवाढीचे एक कारण असू शकते, पण या कारणामुळे वजन वाढणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे.

२. जे लोक कायम तणावामध्ये असतात किंवा ज्यांना नैराश्याचा त्रास आहे अशा लोकांनाही वजन वाढीचा त्रास होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यानेही वजन वाढते.  

३. ज्या महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात, त्यांचे वजन वाढत जाते. बहुतांश महिलांच्या बाबतीत मेनोपॉजच्या आसपास किंवा मेनोपॉजनंतर वजनवाढीचा त्रास दिसून येतो. 

 

४. भूक लागली म्हणून खाणे या प्रकारापेक्षा आपल्याकडे समोर अन्न दिसत आहे म्हणून ते खाणे, अशा प्रकारचे लोक अधिक आहेत. या सवयीमुळे गरज नसताना अतिरिक्त खाल्लं जातं. त्यामुळेही वजन वाढतं.

४ पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर लावा! काळवंडलेली त्वचा स्वच्छ होऊन ब्लीच केल्याप्रमाणे चमकेल..

५. जंकफूड, गोड पदार्थ खाण्याचे वाढलेले प्रमाण हे देखील वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

६. आपण पोटभर जेवतो. पण त्यातुलनेत शरीराला मात्र अजिबात व्यायाम देत नाही. हे देखील बहुतांश लोकांच्या बाबतीत वजनवाढीचे एक मुख्य कारण आहे. आपल्या बाबतीत नेमकं काय चुकत आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितच वजन कमी होऊ शकते.

 

Web Title: dr jagannath dixit explains 6 main reasons for weight gain or obesity, how to control weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.