Join us  

पोट सुटलं-व्यायामालाही वेळ नाही? या बिया सकाळी कोमट पाण्यात घालून प्या, पाहा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 12:13 PM

Drink Chia Seeds Mixed Lukewarm Water on An Empty Stomach : चिया सिड्समध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.

अशा अनेक बिया आहेत ज्यांच्या सेवनानं लठ्ठपणा सहज कमी करता येतो.  यांना चिया सिड्स असं म्हणतात. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. (Health Tips)  याशिवाय हाडं चांगली राहण्यास मदत  होते. यात  मोठ्या प्रमाणात फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी एसिड्सस, फॉस्फरस आणि एँटी ऑक्सि़ेंट्स असतात. ज्यामुळे बरेच फायदे मिळतात. याच्या सेवनाने वजन सहज कमी करता येते. (Drink Chia Seeds Mixed Lukewarm Water on An Empty Stomach In The Morning Obesity Will Reduce Rapidly)

चिया सिड्सने वजन का कमी होते

चिया सिड्समध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.  भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. या बिया पाण्यात भिजवल्या जातात तव्हा जेलसारखी संरचना तयार होते.  ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. या कारणामुळे लोक ओव्हर इटींग करत नाहीत आणि अनावश्यक वजन वाढ टळते. 

चिया सिड्स खाण्याची  योग्य पद्धत

चिया सिड्समध्ये आयर्न, व्हिटामीन सी यांसारखे गुण असतात. ज्यामुळे लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत होते.  वजन कमी करण्यासाठी रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा चिया सिड्स भिजवून ठेवा. सकाळच्यावेळी पाणी हलकं गरम करून याचे सेवन करा. नियमित याचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

हाडंसुद्धा मजबूत होतात

डायबिटीसच्या रुग्णांसाठी चिया सिड्सचे सेवन फायदेशीर ठरते. चिया सिड्समध्ये फायबर्स असतात. ब्लडमधील शुगर कमी करता येते. याशिवाय कमजोर हाडांना मजबूती मिळते. यातील कॅल्शियम, फॉस्फरस हाडांना मजबूत बनवते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सवेट लॉस टिप्स